न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…
शेवगाव प्रतिनिधी :(व्हिजन २४ न्यूज) – शाळेतील आठवणी खरच किती गोड असतात, त्याच गोड आठवणीत निरागसतेचे भाव असतात. याच शब्दांचा धागा पकडत सन २०००-२००१ पासून एकत्र शिकलेल्या न्यू इंग्लिश स्कूल, खरडगाव येथील सन २००५-२००६ मध्ये दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी शाळेतच स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना ज्ञान व संस्कार देणारे शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. वसंतराव बोडखे सर, श्री. कल्याण देवढे सर, श्री. माधवराव काटे सर, श्री. नवनाथ कदम सर, श्री. दिलीप रणसिंग सर, श्री. संतोष टकले सर, श्री. शिवाजी नजन सर, श्रीमती. रेखा हरदास मॅडम, श्री. शिवाजी देशमुख मामा उपस्थित होते. या सर्व गुरुवर्यांनी आपली मनोगते व्यक्त करीत विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संस्काराचे धडे दिले. तसेच शाळेचे माजी विद्यार्थी श्री. संतोष कोळगे सर यांनीही उपस्थित राहून मार्गदर्शन केले. शालेय जीवन किती महत्वपूर्ण असते हे त्यांनी आपल्या मनोगतामधून व्यक्त केले. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या शाळेतील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा घेण्याचा विचार चालू होता आणि अखेर दिनांक ०८/१२/२०२४ रोजी कार्यक्रम संपन्न झाला. पुन्हा एकदा या बॅचचे विद्यार्थी वर्गात जाऊन बसले आणि त्यांच्या मनात शाळेच्या आठवणी दाटून आल्या. विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते. कार्यक्रमासाठी पाचवी पासून दहावी पर्यंत या शाळेत शिकलेले विद्यार्थी उपस्थित होते. त्यामध्ये सुशांत लबडे, आण्णासाहेब बोडखे, पांडुरंग बोडखे, अशोक येवले, नानासाहेब वाघमारे, विशाल मगर, एकनाथ बोडखे, निलेश शेळके, गणेश देशमुख, संजय देशमुख, विजय बोडखे , सोमनाथ वावरे, प्रमोद लांडे, दादासाहेब चित्ते, ज्ञानेश्वर वाघुलकर, अश्पाक सय्यद, शिवाजी लांडे, आश्विनी कुसारे, स्वाती कुसारे, रूपाली लबडे, रुपाली अंबाडे, रोहिणी डावरे, प्रतिभा चित्ते, उमा ससाणे, अनिता रुईकर, पुनम लबडे, आशा गायकवाड, गंगु कुसारे, वंदना लोणकर, वर्षा सुकाळकर यांची उपस्थिती होती.
सर्व विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते व्यक्त करत परिचय करून दिला. काही विद्यार्थी नोकरी व्यवसायानिमित्त अहिल्यानगर, पुणे, येथे आहेत. तर काही विद्यार्थ्यांनी आम्ही उत्तम प्रकारे शेती पिकवतो असे अभिमानाने सांगितले. श्री. प्रमोद लांडे यांनी आपल्या उंच आणि गोड आवाजात कवी अनंत राऊत यांची मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ही कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. श्री. माधवराव काटे सर यांनी समारोपाचे भाषण करीत असतांना शालेय जीवनातील विनोदी किस्से सांगून संस्कार किती महत्वाचे असतात हे सांगितले. या कार्यक्रमासाठी सर्वच माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सर्वांनी मिळून एकत्र स्नेहभोजन केल्याने कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आण्णासाहेब बोडखे व रोहिणी डावरे यांनी केले . प्रास्ताविक रूपाली लबडे यांनी केले. आश्विनी कुसारे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.