फडणवीस साहेब सत्ता स्थापन झाली आहे ; शेतकऱ्यांची कर्जमाफी करा – शेतकरी संघटनेचे दत्ताभाऊ फुंदे
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव द्या आणि कर्जमाफी करा.
जिल्हा प्रतिनिधी मधुकर केदार
ऐतिहासिक महाविजयानंतर महायुतीतील तिन्ही पक्षांनी निवडणूक काळात मतदारांना दिलेली आश्वासने पुर्ण करण्यास प्राधान्यक्रम द्यावा. विशेषत: शेतकऱ्यांना कर्जमाफी देवून बळीराजाला अस्मानी संकटातून बाहेर काढावे. निवडणूक लागल्यानंतर प्रचारा दरम्यान महायुतीच्या अनेक उमेदवारांनी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा घोषणा केल्या होत्या. आता सरकार स्थापन झाले आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब शेतकऱ्यांचे लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना दत्ताभाऊ फुंदे यांनी केली आहे. कोणतेही निकष व कोणत्याही अटी न लावता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी.
निवडणुकीला समोर जाण्यापूर्वी शिंदे सरकारने लाडकी बहिण योजना लागू केली होती. सरकार पुन्हा सत्तेत आले तर या योजनेतून महिलांना महिनाकाठी २,१०० रूपये देण्याचे आश्वासन दिले गेले होते, आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असे हे आश्वासन दिले होते, हे आश्वासन सरकारने तत्काळ पुर्ण करावे. योजनेच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीवर पडणारा ताण कमी करण्याचे आव्हान सरकार समोर राहणार असले तरी, आश्वासनांची पुर्तता करण्यावर सरकारने ठाम राहिले पाहिजे, असे मत दत्तात्रय फुंदे यांनी व्यक्त केले आहे.
प्रचारादरम्यान दिलेले आश्वासन पूर्ण करा..
राज्यातील शेतकरी संपूर्ण कर्जमाफीसोबतच सोयाबीन भावांतर योजना लागू करण्याची मागणी करत आहेत. त्याचं कारण भाजप आणि महायुतीनं सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी देऊ, सोयाबीनसाठी भावांतर योजना राबवू असं आश्वासन शेतकऱ्यांना जाहीरनाम्यात दिलं होतं. आता महायुती सरकार सत्तेत आले आहे महायुती सरकारने दिलेले आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा. होणाऱ्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफी आणि सोयाबीन भावांतरचा मार्ग मोकळा करा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकार दोन्ही निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण करेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन हमी भावाच्या खाली विकलं आहे/ विकत आहेत. सरकारनं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीनं भावांतर योजना लागू करावी. कारण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं जे नुकसान व्हायचं होतं ते झालं आहे. त्यामुळं भावांतर योजनेतून सोयाबीन उत्पादकांना दिलास देण्याचा निर्णय सरकारनं घ्यावा, आणि सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते दत्ताभाऊ फुंदे यांनी केली आहे.