देवळाली प्रवरा नगरपरीषदेने केला दिव्यांगाचा 5% निधी वाटप
देवळाली प्रवरा (व्हिजन 24 न्यूज): दिव्यांग समान संधी समान हक्क 2016 स्थानिक स्वराज्य संस्थेचा 5% निधी नुसार देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने वाटप करण्यात आला त्याबद्दल प्रहार दिव्यांग संघटना उ.अ.नगर जिल्हाअध्यक्ष तथा दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे अध्यक्ष मधुकर घाडगे प्रहार दिव्यांग संघटनेचे उ.अ.नगर जि.सल्लागार तथा दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे खजिनदार सलीमभाई शेख राहुरी तालुका अध्यक्ष योगेश लबडे प्रहार दिव्यांग संघटनेच्या राहुरी तालुका महिला अध्यक्षा तथा दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या सचिव सौ. छायाताई हारदे मॅडम देवळाली प्रवरा शहरअध्यक्ष राजेंद्र सोनवने यांच्या वतीने आभार व्यक्त केले. देवळाली नगरपरिषदेचा 5% निधी 2017 पासून प्रत्येक वर्षी दिव्यांगांना वैयक्तिक लाभ दिला जातो. यावर्षी जवळपास 250 दिव्यांग बांधवांना लाभ मिळाला आहे तसेच सर्व दिव्यांग बांधवांना प्रत्येकी रू. 2000 प्रमाने प्रत्येक दिव्यांग बांधवाच्या थेट बॅक खात्यात जमा करण्यात आला आहे. त्याबद्दल देवळाली प्रवरा नगरपरीषदेचे मा. मुख्याधिकारी विकास नवाळे साहेब मा.सुपेकर साहेब मा. नंदकुमार शिरसाट अश्विनी भांगरे यांनी वेळोवेळी दिव्यांगाना सहकार्य केले त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.