राहुरी कृषि विद्यापीठात आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धेचे आयोजन
राहुरी विद्यापीठ, दि. २५ ऑक्टोबर, २०२४ महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील क्रीडा भवनात दि. २७-२८ ऑक्टोबर, २०२४ रोजी आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मैदानी स्पर्धेचे उद्घाटन दि. २७ ऑक्टोबर, २०२४ रोजी सकाळी ९.०० ते १०.०० या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन महात्मा फुले कृृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, नियंत्रक श्री. सदाशीव पाटील, कुलसचिव डॉ मुकुंद शिंदे, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सचिन नलावडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या मैदानी स्पर्धेमध्ये लांब उडी, उंच उडी, ट्रिपल जंप, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, धावणे व रीले इत्यादी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. या मैदानी स्पर्धेसाठी २७ कृषि महाविद्यालयातील ३७ शिक्षकांसह २९३ मुले व १९८ मुली असे एकूण ५२८ विद्यार्थी सहभागी होणार आहेत.