प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने ९ ऑक्टोबर पासून श्रीवैष्णवी देवी गुफा व दर्शन तसेच चैतन्य देवींचा देखाव्याचे आयोजन
राहुरी(व्हिजन 24 न्यूज)नवरात्रोत्सव निमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने ९ ऑक्टोबर पासून श्री वैष्णवी देवी गुफा व दर्शन तसेच चैतन्य देवींचा देखाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राहुरी येथील ब्रह्मकुमारीज संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे. राहुरी शहरातील नगरपालिकेचे पाठीमागे असणाऱ्या राजयोग भवन येथे बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता या देखाव्याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती ब्रह्मकुमारी नंदादीदी यांनी दिली.
दिनांक ९, १०, ११ ऑक्टोबर पर्यंत या देखाव्याच्या दर्शनाची वेळ सायंकाळी ७ ते १० अशी राहणार असून सायंकाळी ७.३० वाजता आरतीची होईल, अशी माहिती ही देण्यात आली. स्वप्नपूर्ती कल्पवृक्ष या देखाव्याचे मुख्य आकर्षण असणार आहे. मागील वर्षी ही राजयोग भवन च्या वतीने धार्मिक महोत्सव काळात विविध उपक्रमांचे आयोजन केलेले होते. नवरात्रोत्सव महोत्सवानिमित्त आयोजित देखाव्याचा लाभ शहरवासीयांनी विशेष करून महिला भगिनींनी घ्यावा, असे आवाहन राजयोग भवन, ब्रह्मकुमारीज यांच्या वतीने करण्यात आले आहे.