केव्हीके दहिगाव-ने द्वारा कृषि प्रक्रिया व मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
महिलांसाठी कृषि प्रक्रिया व मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
शेतात पिकवलेल्या मालावर प्रक्रिया व मूल्यवर्धन करून त्यातून अधिक पैसा मिळवता येतो, यासाठी शासकीय स्तरावरून विविध योजना व उपक्रम राबवले जात आहे. ग्रामीण भागातील महिला व पुरुष शेतकरी वर्ग यापासून वंचित राहू नये व त्यांनी पिकवलेल्या शेत मालाचे योग्य मोल त्यांना मिळावे यासाठी श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने विविध विषयावर कौशल्य विकास प्रशिक्षणे आयोजित करत आहे. या केंद्राच्या माध्यमातून महिलांसाठी कृषि प्रक्रिया व मूल्यवर्धन या विषयावर दि. १८ ते २२ सप्टेंबर २०२४ दरम्यान पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम ज्ञानेश्वर कृषि विज्ञान फार्म भेंडा येथे पार पडला. या प्रशिक्षणामध्ये ६० हून अधिक महिला सहभागी झाल्या. या प्रशिक्षणामध्ये सहभागी महिलांसाठी तांत्रिक माहितीसोबत प्रात्यक्षिकांचेही आयोजन करण्यात आले. यामध्ये दूध प्रक्रिया, फळे व भाजीपाला प्रक्रिया, सोयाबीन प्रक्रिया, बेकरीचे विविध पदार्थ तसेच प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धित पदार्थांचे पॅकेजिंग, लेबलिंग, परवाना धारण, मार्केटिंग इ. विषयावर मार्गदर्शन व प्रकल्प भेटीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सचिव अनिल पं. शेवाळे, केंद्राचे प्रमुख डॉ. कौशिक, जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लांडगे, डॉ. ताकटे, जिजामाता कृषि विद्यालयाचे प्रा. मते इ. उपस्थित होते. या कौशल्य विकास प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या महिलांना केव्हीके दहिगाव-ने चे इंजि. राहूल एस. पाटील, सचिन बडधे तसेच सोनई कृषि महाविद्यालयाचे प्रा. झिने, केव्हीके कोल्हापूर च्या श्रीमती प्रतिभा ठोंबरे, केव्हीके नाशिक चे हेमराज राजपूत, इन्स्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अहमदनगर महाविद्यालाचे प्रा. सागर माळवदे, अंबिका मिल्क प्रॉडक्ट च्या संचालिका श्रीमती अंबिका शेळके, आत्मा शेवगावचे निलेश भागवत, पी.एम.एफ.एम.ई. योजना डी.आर.पी. शहाणे इ. नी मार्गदर्शन केले.