वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भगवानगडावर भेट
खरवंडी कासार येथे कार्यकर्त्यांनी केले भव्य स्वागत
जिल्हा प्रतिनिधी मधुकर केदार
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज भगवानगडावर जाऊन संत भगवान बाबाच्या समाधीचे दर्शन घेतले. भगवान गडाचे महंत डॉ . नामदेव शास्त्री यांची भेट घेत यांचेही आशीर्वाद घेतले.
बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 25 जुलै रोजी निघालेली ओबीसी आरक्षण बचाव यात्रा आज दुपारी खरवंडी कासार येथे पोहोचली. यावेळी त्यांची मिरवणुक काढत फटाकड्या ची आतीष बाजी करत त्यांचे स्वागत केले. यावेळी वंचित आघाडीच्या नेत्यांसह विविध पक्षांच्या ओबीसी नेत्यांनी डॉ. प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत केले.
यावेळी व वंचित चे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, आम आदमी पक्षाचे किसन आव्हाड, रोहिणी ठोंबे, सुनिता जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी खरवंडी कासार येथे कार्यकर्त्या बरोबर संवाद साधताना डॉ. आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगेंच्या मागणीवर कोणत्याही राजकीय पक्षाने ठोस भूमिका न घेतल्याने आज कोणताही निर्णय झाला नाही व समाजाला योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने आज समाज विभागला गेला आहे. आज समाजात दोन गट पडले आहेत. एक गट मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारा तर एक गट मराठा आरक्षणाला विरोध करणारा यामुळे समाजात गावागावात सामाजिक भांडणाच्या वल्गना केल्या जाऊ लागले आहेत. यामुळे गावगाड्यातील समाजातील परिस्थिती बिघडू नये म्हणून ही यात्रा असून सर्व समाजातील जातीमधील नागरिकांनी आपापसातील भांडणे करू नये. राजकीय निर्णय काही घ्या परंतु आपापसातील सलोखा कायम ठेवा. आरक्षण हे विकासाचे साधन आहे. समाजात समाजात दुरावा वाढू नये राजकारण काही होईल तुम्हालाही मतदानाचे स्वातंत्र्य आहे ज्याला जास्त मते मिळतील तो निवडून येईल. आरक्षण हा सरकार व न्यायालयाचा विषय आहे या विषयावरून समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. या यात्रेचा सात ऑगस्ट रोजी संभाजीनगर येथे समारोप होणार आहे.
प्रा. चव्हाण म्हणाले की, मराठवाड्यातील गोरगरीब मराठ्यांना समाजातील वंचित घटकांना आरक्षण मिळावे या जरांगेच्या सुरुवातीच्या मागणीला आमचा पाठिंबा होता परंतु पुढे पुढे या आंदोलनातून मागण्या वाढत गेल्या व यात राजकारण घुसून ओबीसीतूनच आरक्षण हवे या मागणीला मात्र आज विरोध होत आहे.
यावेळी खरवंडी कासार परिसरातील बहुसंख्य वंचीत आघाडी चे कार्यकर्त स्वागतला उपस्थित होते.