लहानपणी शिक्षकांनी मोठी स्वप्ने दाखवली – प्रियंका आघाव
लहानपणी शिक्षकांनी मोठी स्वप्ने दाखवली – प्रियंका आघाव
राहुरी : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये बाल विद्यामंदिर व कै. लालाशेठ बिहानी विद्यामंदिर प्रशाला राहुरी शाळेतील माजी विद्यार्थिनी कुमारी प्रियंका अनिल आघाव,व श्री अक्षय धिमते यांनी मोठे यश संपादन केले. कुमारी प्रियंका आघाव हिची जलसंपदा विभाग सातारा येथे नियुक्ती झाली असून श्री. अक्षय धीमते यांची वित्ती व लेखाधिकारी म्हणून निवड झाली आहे. शाळेतर्फे या दोन्ही माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्राथमिक विभागांमध्ये शिकत असताना शाळेचे वर्गशिक्षक श्री संदीप रासकर सर हे अनेक मोठे शास्त्रज्ञ व यशस्वी व्यक्तींच्या जीवनातील बालपणीच्या गोष्टी सांगत. जे काही करायचे ते नेहमी भव्य व दिव्य करायचे या गोष्टी जसे जसे मोठे होत गेलो तशा सत्यात उतरत गेल्या. शिक्षकांविषयी नकळत आदर युक्त भीती खूप वाटत असायची पण आज मोठे झाल्यावर लक्षात येते की त्यावेळेस छडी लागे छम छम विद्या येई घम घम हे गीत खरोखरच योग्यच होते असे मनोगत अक्षय धिमते यांनी व्यक्त केले.
स्पर्धा परीक्षेमध्ये जर यश मिळवायचे असेल तर सोशल मीडिया, व्हॉट्स ॲप या गोष्टींपासून विद्यार्थ्यांनी स्वतःला दूर ठेवले पाहिजे व संपूर्ण लक्ष आपल्या ध्येयावर केंद्रित केले पाहिजे. शाळेने केलेला सत्कार निश्चित पुढील भावी आयुष्यासाठी व वाटचालीसाठी प्रेरणादायी राहील असे मनोगत प्रियंका आघाव यांनी व्यक्त केले. राहुरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती. प्रभावतीताई बिहाणी, सेक्रेटरी श्री. मनोज बिहाणी, सह सेक्रेटरी श्री. अनुप बिहाणी, संस्थेचे सर्व पदाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक श्री. कैलास अनाप, उपमुख्याध्यापिका सौ सुरेखा देशपांडे, सौ. सुजाता नगरकर, श्री. आर जे पवार. बाल विद्यामंदिर चे मुख्याध्यापक गुलाब मोरे. यांनी दोन्ही माझे विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी क्रीडा शिक्षक श्री मनोज सुपेकर सर, श्री सतीश गुलदगड सर, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन श्री धनंजय गिरी सर व आभार प्रदर्शन श्री संदीप रासकर सर यांनी केले.