निवडणूक

शेवगाव तालुक्यातील पुढाऱ्यांना लागले निवडणुकीचे वेध

जिल्हा प्रतिनिधी  / मधुकर केदार

शेवगाव तालुक्यातील पुढाऱ्यांना लागले निवडणुकीचे वेध

VISION 24 NEWS

लोकसभा निवडणूक ही विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम असते. कार्यकर्ते व मतदार यांच्याशी सतत संपर्क  साधून विधानसभा निवडणुकीत विजय मिळावा या हेतूने माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, आ. मोनिकाताई राजळे व महाविकास आघाडी चे भावी आमदार प्रताप काका ढाकणे यांनी तालुका भर संपर्क अभियान राबविले आहे.  घुले पाटील, आ. राजळे ताई खासदार विखे पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

प्रतापराव ढाकणे, आ. निलेश लंके यांचा जोरदार प्रचार करत आहेत. पण शेवगाव तालुक्यातील बुलंद तोफ म्हणून ज्यांना ओळखलं जाते त्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांनी मात्र अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट का केली नाही? कार्यकर्त्यात उलट सुलट चर्चा होत आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत सौ. हर्षदा काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना साथ दिली होती. त्यांनी त्या वेळी आ. संग्राम भय्या जगताप यांचा प्रचार करून विखे पाटील यांना जाहीर विरोध केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत आ. मोनिकाताई राजळे यांना उमेदवारी मिळू नये म्हणून प्रचंड विरोध केला होता.

आता पुन्हा खासदार विखे पाटील मैदानात उतरले आहेत. सौ. काकडेताई तुतारी ला साथ देणार काय? कार्यकर्ते चर्चा करीत आहेत. काही दिवसापूर्वी शेवगाव शहर व तालुक्यातील भाजप कार्यकर्ते व भाजप चे जेष्ठ नेते सुनील ऊर्फ बंडू शेठ रासने यांनी विखे पाटील कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत. सर्व सामान्य कार्यकर्त्याना भेटत नाहीत म्हणून मुंबई भाजप कार्यालयात जाऊन राजीनामा दिलेला आहे. एकेकाळी माजी आ. तुकाराम गडाख यांचे समर्थक असलेले रासने लोकप्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांचा जनसपंर्क दांडगा आहे. माजी खासदार दिलीप गांधी यांचे ते कट्टर समर्थक होते. अचानक रासने यांनी राजीनामा दिल्यामुळे खासदार विखे पाटील यांचा तोटा होणार? अशी नागरिकांत चर्चा आहे. महाविकास आघाडीचे आ. निलेश लंके यांनी राबवलेल्या संपर्क अभियान ला तालुक्यातील जनतेने चांगला प्रतिसाद दिला असल्याचे निदर्शनास येत आहे.

लोकसभा निवडणूक देशाचे भवि्तव्य ठरविणारी निवडणूक आहे. महाविकास आघाडी, महायुती च्या प्रचाराला सुरुवात झाली. हर्षदाताई काकडे भाजप च्या जेष्ठ नेत्या असताना सुद्धा त्यांना वारंवार विधानसभा निवडणुकीत संधी नाकरण्यात आल्या मूळे काकडेताई भाजपात नाहीत. मात्र शेवगाव, पाथर्डी मतदान संघात त्यांचा जनसपंर्क दांडगा आहे. त्यांच्या शिक्षण संस्था आहेत. जनतेच्या रास्त समस्या सुटाव्यात म्हणून त्या सतत रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतात. जनशक्ती मंच ही त्यांची संघटना आहे. त्यामूळे त्यांच्या निर्णयाकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
×