अहमदनगर जिल्हा महसूल विभाग कबड्डी संघ कर्णधार पदी वैभव कराड यांची निवड
व्हिजन 24 न्यूज
अहमदनगर जिल्हा महसूल विभाग क्रीडा स्पर्धा २०२३-२४ जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांचे मार्गदर्शनखाली वाडिया पार्क अहमदनगर येथे पार पडली सदर स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ साहेब यांनी केले. सदर स्पर्धेमध्ये कबड्डी खेळात अहमदनगर रॉयल्स संघाने एक हाती अंतिम विजय मिळवला व ट्रॉफीवर नाव कोरले. पुढील विभागीय स्पर्धेसाठी जळगाव येथे अहमदनगर जिल्हा कबड्डी कर्णधार पदी वैभव कराड (तलाठी पाथर्डी) यांची निवड झाली. त्यांना उपविभागीय अधिकारी मते साहेब, उपजिल्हाधिकारी बालाजी शिरसागर साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.