श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाला शिरसाटवाडी ग्रामस्थांकडून तीन लाख एक हजार एकशे अकरा रुपयाची रोख देणगी देण्यात आली.
जिल्हा प्रतिनिधी / मधुकर केदार
श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाला शिरसाटवाडी ग्रामस्थांकडून तीन लाख एक हजार एकशे अकरा रुपयाची रोख देणगी देण्यात आली.
व्हिजन २४ न्यूज
श्री क्षेत्र गहिनीनाथ गड चिंचोली गडाचे मठाधिपती ह. भ. प. विठ्ठल महाराज यांनी भाविक भक्तांसाठी पंढरपूर या ठिकाणी मठासाठी जागा अपुरी पडत असल्या कारणामुळे साडे अकरा एकर जमीन खरेदी केली असून यासाठी तमाम महाराष्ट्रातील वामनभाऊ महाराज भक्तांकडून निधी जमा झाला असून शिरसाटवाडी ग्रामस्थांनी सुद्धा फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तीन लाख एक हजार एकशे अकरा रुपयाची रोख देणगी रक्कम पाथर्डी येथील नवीन बस स्थानक या ठिकाणी संत भगवानबाबा व संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त गहिनीनाथ गडाचे महंत ह. भ. प विठ्ठल महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले. त्यावेळी त्यांना शिरसाटवाडी ग्रामस्थांच्या वतीने रोख रक्कम देणगी देण्यात आली.
यावेळी चेअरमन जनार्दन शिरसाठ, माजी सरपंच संजय शिरसाट, मुंजोबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनंत राजे कराड, माजी सरपंच त्रिंबक अण्णा शिरसाठ, भानुदास शिरसाठ, मेजर सुभाष शिरसाठ, बाळासाहेब शिरसाठ, सुदाम शिरसाठ, भीम बाबा शिरसाट, मारुती महाराज शिरसाट, योगेश शिरसाट, मुकुंद महाराज सानप, एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अंबादास शिरसाट, अर्जुन शिरसाट, सचिन शिरसाट व अनेक मान्यवर मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.