श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामणभाऊ महाराज यांची ४८ वी पुण्यतिथी विविध उपक्रमाने होणार साजरी
प्रतिनिधी / प्रशांत बाफना
श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामणभाऊ महाराज यांची ४८ वी पुण्यतिथी विविध उपक्रमाने होणार साजरी
शिरुर कासार :- महाराष्ट्रातील थोर संत वैराग्याचे महामेरु प्रातःस्मरणीय संत वामनभाऊ महाराज यांची 48 वी पुण्यतिथी 2 फेब्रुवारी आणि 3 फेब्रुवारी 2024 रोजी विविध उपक्रमांनी आणि मोठ्या भक्ती भावाच्या वातावरणात संपन्न होणार आहे. यानिमित्त महाराष्ट्रातील तमाम भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या विश्वस्ताकडून करण्यात येत आहे.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री संत वामन भाऊंच्या 48 व्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये शुक्रवार दिनांक 2 व शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी मोठ्या थाटात व भक्ती भावाच्या वातावरणामध्ये विविध सामाजिक उपक्रम धार्मिक कार्यक्रमासह कीर्तन पुष्पवृष्टी होणार आहे. प्रथमतः सकाळी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे व संत महंतासह वेद ब्राह्मणांच्या हस्ते श्री संत वामनभाऊ महाराज मूर्ती व समाधीचा महाभिषेक होऊन महाआरती होईल. सकाळी 10 वाजता ह. भ. प. आसाराम महाराज बडे आळंदी देवाची यांचे कीर्तन होऊन बरोबर 11 वाजून 45 मिनिटांनी मुख्य पुष्पवृष्टी होऊन संत वामनभाऊ महाराज यांचा जयघोष होणार आहे. त्यानंतर आलेल्या मान्यवरांसह जमलेल्या समुदायासमोर मार्गदर्शन होईल शेवटी महंत विठ्ठल महाराज यांच्या आशीर्वाद पर मार्गदर्शन होऊन दुपारी ठीक 1.30 वाजता महापंक्तीचा कार्यक्रम होऊन या सोहळ्याची सांगता होणार आहे हा सर्व उपक्रम महंत गुरुवर्य ह. भ. प. विठ्ठल महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत.
यानिमित्त भव्य सर्व रोग निदान शिबिर विविध ख्यात नाम डॉक्टरांच्या उपक्रमातून सर्व रोग निदान शिबिर, डोळे तपासणी, इसीजी, बीपी, शुगर, आदी रोगांचे मोफत तपासणी होणार आहे तेव्हा या शिबिराचाही भाविकांनी लाभ घ्यावा. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची उपस्थिती लाभणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आजी-माजी मंत्र्यांसह आजी-माजी आमदार, खासदार, संत, महंत व लाखोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती लाभणार आहे, तेव्हा हा नयनरम्य सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विश्वस्तांनी केले आहे.