शिवजयंतीनिमित्त “एकता महाराष्ट्र वक्ता” राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
अहमदनगर प्रतिनिधी / प्रशांत बाफना
शिवजयंतीनिमित्त “एकता महाराष्ट्र वक्ता” राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
अहमदनगर : एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य द्वारा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ‘एकता महाराष्ट्र वक्ता’ ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांना दिली. ही स्पर्धा चार गटांमध्ये होणार असून त्याचे वयोगटनिहाय विषय – गट पहिला : इ. १ ली ते इ. ५ वी. विषय – १) शिवरायांचे बालपण. २) मी सैनिक झालो तर. ३) मोबाईल – शाप की वरदान. गट दुसरा : इ. ६ वी ते इ. ८ वी. विषय – १) वाढते प्रदुषण – एक समस्या. २) शिवरायांच्या जडणघडणीत जिजाऊ माँसाहेबांची भुमिका. ३) मी शेतकरी बोलतोय. गट तिसरा : इ. ९ वी ते इ. १२ वी. विषय – १) बालविवाह – एक कलंक. २) शिवरायांचे शेतीविषयक धोरण. ३) स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव. गट चौथा : महाविद्यालयीन. विषय – १) मी वाचलेले पुस्तक. २) माझा आवडता नेता. ३) शिवकाल ते स्वातंत्र्योत्तर काळातील बदलणारी राजकीय परिस्थिती.
स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकासाठी पुढील नियम व अटी असतील. १) वक्तृत्व स्पर्धेतील भाषणाची सुरवात करतांना स्पर्धकाला “एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित ‘एकता महाराष्ट्र वक्ता’ या स्पर्धेतील मी स्पर्धक” – (येथे स्पर्धकाने स्वतःचे नाव, शाळा, हायस्कूल, महाविद्यालयाचे नाव व पत्ता, आपला गट, आपला विषय आणि त्यानंतर प्रत्यक्ष भाषणाला सुरुवात) अशा पद्धतीने करावी. २) सहभागी स्पर्धकांच्या व्हिडिओचा एकूण कालावधी पुढीलप्रमाणे असावा – गट पहिला – वेळ ४ ते ५ मिनिट. गट दुसरा – वेळ ५ ते ६ मिनिट. गट तिसरा – वेळ ६ ते ७ मिनिट. गट चौथा – वेळ ७ ते ८ मिनिट. ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा कमी वा जास्त वेळ असलेले व्हिडिओ स्पर्धेतून बाद केले जातील. ३) स्पर्धकाच्या संपूर्ण भाषणामध्ये कुठेही सामाजिक/धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य नसावे. एखाद्या राजकीय, समाजसेवक वा महनीय व्यक्ती, गट, समाज, पक्ष, राष्ट्र यांचा अवमान होईल असेही वक्तव्य संपूर्ण भाषणादरम्यान कुठेही नसावे. अशा पद्धतीच्या भाषणाचे व्हिडिओ कुठलेही कारण, स्पष्टीकरण वा पुर्वकल्पना न देता स्पर्धेतून बाद करण्यात येतील. ४) या स्पर्धेचा निकाल दि.१ मार्च २०२४ रोजी वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध केला जाईल. ५) आयोजकांनी जाहिर केलेल्या निकालातील विजेत्या स्पर्धकांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून निकाल कळवला जाईल. ६) विजेत्या स्पर्धकांना आगामी ७ वे एकता मराठी साहित्य संमेलन, दहिवंडी या कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात येईल. त्यावेळी स्पर्धकाला स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक असेल. स्पर्धकाला बक्षीस वितरणानंतर आपले स्पर्धेतील भाषण सादर करण्यास वेळ दिला जाईल. ७) पुरस्काराचे स्वरूप : रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व ग्रंथभेट. ८) आयोजकांनी दिलेला निकाल सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल, त्यावर स्पर्धकाला कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेता येणार नाही. हा नियम मोडणाऱ्या स्पर्धकाला भविष्यातील एकता फाउंडेशन ने आयोजित केलेल्या कोणत्याही कार्यक्रमात, स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही. ९) स्पर्धेसाठी कुठलेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. १०) सहभागी स्पर्धकांनी आपले व्हिडिओ ९४२१६२८६८७ या व्हाटस्अप क्रमांकावर दि.१९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत. मुदतीनंतर आलेल्या व्हिडिओंचा विचार केला जाणार नाही.
संपर्क : – शिवचरित्रकार कैलास तुपे – ९४२१६२८६८७. नितीन कैतके – ९७६७४४८१४९. लखुळ मुळे – ९८२२९४५२२२. राजेश बीडकर – ९४०३५७७३३८. शिवलिंग परळकर – ९४२१३४२९११. गोकुळ पवार – ९८८१००४४२२. अनंत कराड – ७४९९२०३५१०.
एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेला श्री.अशोक(मामा) पाखरे, आदर्श सरपंच (मानूर ता.शिरूरका.जि.बीड), आदर्श शिक्षक श्री.पोपटराव फुंदे (सामाजिक कार्यकर्ते, पाथर्डी जि.अहमदनगर) यांचे सौजन्य लाभणार असून या स्पर्धेत राज्यभरातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.