जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभुळगाव येथे एक आठवड्याचे शिवकालीन लाठीकाठी व हत्यार चालवण्याचे प्रशिक्षण आयोजित
व्हिजन 24 न्यूज
राहुरी / (बाभुळगाव)- शंभू सूर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभुळगाव येथे शिवकालीन लाठीकाठी व हत्यार चालवण्याचे प्रशिक्षण दिनांक 16 जानेवारी 2024 पासून आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये एका आठवड्याच्या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांना दंड लाठी काठी भाला तलवार यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या संस्थेचे सचिव तथा मुख्य प्रशिक्षक बबलू टेकाळे व त्यांचे सहकारी श्री. गणेश माने व किरण राऊत हे सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत.
या खेळामधून विद्यार्थ्यांना एकाग्रता व सातत्य या गुणांच्या माध्यमातून शारीरिक व्यायामाची आवड लागावी हा प्रमुख हेतू आहे. या कामी शाळेची शिक्षक विजय महामुनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवंद स्वतः थांबून विद्यार्थ्याकडे लक्ष देत आहेत. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय कसबे, उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब थोरात, सनी भाऊ पाटोळे, श्री. सुधाकर वाघमारे हे तसेच गावचे सरपंच गोरक्षनाथ गिर्हे, उपसरपंच अनिल वाघमारे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थ, मान्यवर यांचे सहकार्य लाभत आहे.