अशोक शिंदे सर यांचा स्नेहलय व उचल फाउंडेशनच्या वतीने जाहीर सत्कार
जिल्हा प्रतिनिधी : मधुकर केदार
शेवगाव : श्री. राह नबा कुमार व तन्द्रा बरुआ यांच्या शुभहस्ते व मा. संजना जागुष्टे (दिवाणी न्यायाधीश-शेवगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत राह नबा कुमार हे महात्मा गांधी आश्रम ट्रस्ट (नौखाली- बांगलादेश) चे मुख्य कार्यकारी अधिकारी असून गेली 34 वर्ष गांधी विचाराचा प्रचार, प्रसार ते करत आहेत. त्यांच्या हस्ते उचल फाउंडेशनला वेळोवेळी केलेल्या सहकार्या बद्दल व उत्कृष्ट सामाजिक कार्याबदल सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्याच बरोबर सायली सामाजिक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष प्रवीण भाऊ भारस्कर यांना सन्मानित करण्यात आले ते काही कारणास्तव उपस्थित नसल्याने त्यांच्या सन्मानपत्र मा. संजना जागुष्टे (दिवानी न्यायाधीश-शेवगाव) तन्द्रा बरुआ यांच्या हस्ते सौ उषा अशोक शिंदे सन्मान स्विकार केला.
ह्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती डॉ. गिरीश कुलकर्णी (संस्थापक स्नेहालय अहमदनगर) श्री भूषण देशमुख जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे, डॉ. संजय लड्डा, डॉ. मनीषा लढ्ढा, उचल फाउंडेशन संचालक सचिन खेडकर, सौ. मिनाक्षी शिंदे, सौ. वसुधा सावरकर, बलवंत राजे, सनी देशमुख, सुरेश लांडे पाटील, शेवगाव गावातील मान्यवर व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.