ब्रेकिंग न्यूज

मोहटादेवी चरणी १ कोटी ६५ लाखाचे दान

मोहटादेवी गडावर देवस्थानचे दानपेटयाची मोजमाप नुकतीच पोलीस व देवस्थान सुरक्षा व सीसीटीव्हीचे निगराणीमध्ये नुकतेच संपन्न झाले.

व्हिजन 24 न्यूज

पाथर्डी: शारदीय नवरात्र उत्सव काळात राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री क्षेत्र मोहटादेवीच्या चरणी भरभरून दान अर्पण केले आहे. सुमारे एक कोटी ६५ लाखाचे दान देवी भक्तांकडून देवीला अर्पण झाले असून यामध्ये रोख रक्कम,सोने व चांदी यांचा समावेश आहे. मोहटादेवी गडावर देवस्थानचे दानपेटयाची मोजमाप नुकतीच अहमदनगर येथील धर्मादाय उपआयुक्त यांचे प्रतिनिधी उमाकांत फड, देवस्थान विश्वस्त, पाथर्डी येथील सराफ मे. काशिन्नाथ वामन शेवाळे, पोलीस व देवस्थान सुरक्षा व सीसीटीव्हीचे निगराणीमध्ये नुकतेच संपन्न झाले.

या मोजमाप मध्ये पेटीतील रोख रक्कम एक कोटी एक लाख दोन हजार, देणगी पावत्यांव्दारे तेहतीस लाख ७६ हजार ७६०, कावड, पालखी एकत्रित दोन लाख वीस हजार ६२५,अॉनलाईन पाच लाख बारा हजार ४००, सोने २६७ ग्रॅम मूल्यांकन रूपये सोळा लाख एकत्तीस हजार, चांदी वस्तू ९ किलो १२५ ग्रम मूल्यांकन रुपये सहा लाख ८४ हजार ६००, अशा विविध स्वरुपात रुपये १ कोटी ६५ लाखाचे देणगी देवस्थानास प्राप्त झाली. वेळेअभावी देणगीची मोजणी पूर्ण होऊ शकलेली नाही. शारदीय नवरात्र उत्सवात देवीच्या लाखो भक्तांनी देवीचे दर्शन घेऊन मनोभावे असे भरभरून दान देवीच्या चरणी अर्पण केले. देवी नवसाला पावते अशी भक्तांमध्ये अफाट श्रद्धा आहे. त्या श्रद्धेपोटी भक्त रोख स्वरूपात, सोन्याच्या व चांदीच्या वस्तू, देणगी पावती अशा स्वरूपात भरभरून देवीला दान करतात.

मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्र महोत्सव यशस्वी होणेसाठी जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांचे मार्गदर्शनाखाली देवस्थानचे चेअरमन तथा अहमदनगर चे जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी, दिवाणी न्यायाधीश तथा विश्वस्त अश्विनी बिराजदार, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, तहसीलदार श्याम वाडकर, गट विकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, विश्वस्त शशिकांत दहिफळे, अँड. कल्याण बडे, डॉ. श्रीधर देशमुख, अनुराधा केदार, अँड. विक्रम वाडेकर, श्रीराम परताणी, बाळासाहेब दहिफळे, प्रतिभा दहिफळे, विठ्ठल कुटे, अक्षय गोसावी यांनी भाविकांना विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या. अशी माहिती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
×