ढोरजळगाव येथे कापूस खरेदी केंद्र सुरू
जिल्हा प्रतिनिधी: मधुकर केदार
शेवगाव: कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी बाबासाहेब महाराज शिंदे, मारुती तूतारे,आजिनाथ महाराज बुटे या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.पहिल्याच दिवशी शुभ मुहूर्तावर ८१०० भाव देण्यात आला. यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे कापूस उत्पादनात घट झाली आहे तसेच कापसाचे भाव देखील तुलनेत कमी आहेत आहेत यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतकऱ्याच्या मालाला योग्य मोबदला देऊ तसेच तसेच शेतकऱ्यांनी कापूस टप्प्याटप्प्याने भावाचा अंदाज घेऊन विक्री करावी असे प्रतिपादन केंद्र चालक सोपान सासवडे यांनी शेतकरी बंधूंना केले . ढोरजळगाव शे.चे सरपंच डॉ सुधाकर लांडे, ढोरजळगाव ने चे सरपंच गणेश कराड,अनंता उकिरडे,सुखदेव उकिरडे, सुखदेव कराड, गणेश दगडू दुकळे,छत्रपती उगले,शेषराव कराड,सचिन नाकाडे, भुजंग उकिरडे,अशोक कराड, आप्पासाहेब बर्गे, सदाशिव अरगडे, बाबासाहेब नाकाडे, पाराजी बुटे, रामकिसन फुंदे, मधुकर केदार, मंगेश खाडे,किरण बुटे,सुधीर खाडे, दीपक झाडे, कोंडिराम सासवडे,काशिनाथ सासवडे,रामकिसन सासवडे आदि मान्यवर उपस्थित होते.