अहिल्यानगर

राज्यातील 511 तर जिल्‍ह्यातील 29 ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ

अहमदनगर दि. 19 ऑक्टोबर – गरीब, होतकरू, बेरोजगार युवक-युवतींना मोफत प्रशिक्षणातून नोकरी तथा व्यवसायातून अर्थार्जनाचे साधन उपलब्ध करून देण्याची खात्री असलेल्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ राज्यात 511 ठिकाणी तर अहमदनगर जिल्ह्यातील 29 ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे एकाचवेळी करण्यात आला.

कार्यक्रमास मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक हे उपस्थित होते. तर नवनागापूर उद्योजकता कौशल्य विकास केंद्र, नवनागापूर येथे आयोजित कार्यक्रमातून जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त निशांत सुर्यवंशी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनिल शिंदे, प्राचार्य श्री जहागीरदार, संस्थाचालक प्राचार्य अंकुश दराडे, कौशल्य व रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री यांचे खासगी सचिव भास्कर देशमुख, रोटरी क्लबचे नितीन थाडे, प्रा.मनिषा जोगदंड दूरदृष्यप्रणालीद्वारे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जिल्ह्यातील 29 केंद्राचा शुभारंभ
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यासह जिल्हयातील अकोले तालुक्यातील केळी कोतुळ, राजुर, जामखेड तालुक्‍यातील नान्नज, खर्डा, कर्जत तालुक्यातील कोरेगांव, मिरजगांव, राशीन, कोपरगांव तालुक्यातील शिंगणापूर, संवत्सर, अहमदनगर तालुक्यातील नवनागापुर, नागरदेवळे, नेवासा तालुक्यातील घोडेगांव, सोनई, पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर , निघोज, पाथर्डी तालुक्यातील तीसगांव, मिरी, राहाता तालुक्यातील लोणी खुर्द, पुणतांबा, संगमनेर तालुक्यातील साकुर, आश्वी, शेवगांव तालुक्यातील दहीगाव ने, बोधेगांव, श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी, बेलवंडी आणि श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर बुद्रुक, निपाणी वडगांव व राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ व वांबोरी या ठिकाणच्या केंद्रांचा दूरदृष्य प्रणालीद्वारे शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Articles

One Comment

  1. Dear Website Owner,

    I hope this email finds you well. I recently discovered your website and was impressed by the quality of your content and the helpful information you offer to your audience. In light of this, I would like to propose a backlink exchange that could benefit both our websites.

    My website, https://m.cheapestdigitalbooks.com/, is focused on providing affordable digital books to readers around the world. We currently have a strong online presence with a Domain Authority (DA) of 13, a Page Authority (PA) of 52, and a Domain Rating (DR) of 78. Our website features 252K backlinks, with 95% of them being dofollow, and has established connections with 5.3K linking websites, with 23% of these being dofollow links.

    I believe that a mutually beneficial backlink exchange could be of great value for both of our websites, as it may lead to an increase in website authority and improve our search engine rankings. In this collaboration, I am willing to add backlinks from my website using your desired keywords and anchor texts. In return, I would be grateful if you could include backlinks with my desired keywords and anchor texts on your website.

    I kindly request that you visit my website, https://m.cheapestdigitalbooks.com/, to get a sense of the potential benefits this partnership could bring to your site. I am confident that this collaboration will provide a win-win situation for both parties, and I look forward to learning more about your thoughts on this proposal.

    Thank you for considering my offer. I am excited about the potential growth this partnership may bring to our websites and am eager to discuss the details further. Please do not hesitate to reach out to me at your convenience.

    Best regards,

    David E. Smith
    Email: david@cheapestdigitalbooks.com
    Address: 3367 Hood Avenue, San Diego, CA 92117

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
×