“शासन आपल्या दारी” अभियानांतर्गत पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
व्हिजन 24 न्युज
अहमदनगर दि. २१ जुलै- “शासन आपल्या दारी” अभियानांतर्गत पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत यंत्रणांकडून आढावा घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री सालीमठ म्हणाले की, “शासन आपल्या दारी” अभियानांतर्गत जिल्ह्यात कार्यक्रमाचे नियोजन आहे. या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी त्यांना देण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात लाभार्थी तसेच नागरिक येणार असल्याने त्या पद्धतीने चोखपणे नियोजन करण्यात यावे. या कामात कुठल्याही प्रकारची हयगय होणार नाही यादृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
बैठकीस सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.