परिवहन एसटी महामंडळाने बंद केलेली राहुरी तालुक्यातील काही भागातील बस सेवा पूर्ववत चालू करा – गंगाधर सांगळे पाटील
व्हिजन 24 न्युज (राहुरी) : दि.15/7/2023 रोजी राहुरी शहर शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख गंगाधर सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शिवसैनिक व पदाधिकारी यांनी बस स्थानक प्रमुख यांना राहुरी तालुक्यात पूर्वी चालू असलेल्या बस सेवा काही भागातील बंद केले गेले आहेत त्या बस सेवा पूर्ववत लवकरात लवकर चालू करण्यात याव्यात म्हणून लेखी सूचना केल्या आहेत त्या लेखी पत्रात असे म्हटले आहे की संबंधित बस स्थानक अधिकारी काही ग्रामीण भागामध्ये बस सेवा पुरवण्यास कमी पडत आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील मुले मुली शिक्षणापासून वंचित राहण्यास हे कारण आहे.
त्याचबरोबर ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांना शहरात उद्योग धंदे निमित्त व इतर काही आवश्यक काम निमित्त यावे लागते एसटी सेवा नसल्यामुळे खाजगी वाहनातून जास्त पैसे देऊन प्रवास करावा लागतो त्याच प्रकारे शाळेत कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होते तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून महिलांना अर्ध तिकीट योजना चालू केली परंतु ग्रामीण काही भागांमध्ये बस सेवा नसल्यामुळे वरील शासनाच्या योजनेचा महिलांना फायदा मिळत नाही या सर्व गोष्टीला परिवहन मंडळाचे संबंधित अधिकारी जबाबदार आहेत मुद्दामून त्यांच्या हलगर्जीपणामुळे ग्रामीण भागातील शालेय कॉलेज विद्यार्थी इतर ग्रामीण भागातील नागरिकांचे आर्थिक नुकसान व शारीरिक हाल होतात.
वरील सर्व गोष्टीचा विचार करून शहर शिवसेनेच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना पुर्ववत बस सेवा चालू करण्याच्या सूचना करून तालुक्यातील वांबोरी देवळाली टाकळी मानोरी बारागाव नांदूर मांजरी सोनगाव म्हैसगाव अशा मोठ्या ग्रामपंचायतीच्या गावाजवळच छोटी छोटी खेडे वाड्या वरत्या जोडलेल्या असल्याकारणाने वरील गावांमध्ये प्रत्येकी एक बस मुक्कामी ठेवणे गरजेचे असल्याच्या सूचनाही लेखी पत्र देण्यात आल्या आहे वरील सूचनाची लवकरात लवकर अंमलबजावणी झाली पाहिजे तशाप्रकारे आम्हाला लेखी देण्यात यावे वरील लेखी निवेदनावर सांगळे यांच्याबरोबर विकास काशीद भानुदास जाधव सर बाळासाहेब येवले सुकलाल वाघ संतोष सरोदे विकास साळवे राजेश कुमार भागवत लक्ष्मण धोत्रे गोरक्षनाथ सिन्नरकर दुर्गेश वाघ अजित इनामदार रायभान मंडपवाले इत्यादी शिवसैनिक व ग्रामस्थ आणि प्रवासी उपस्थित होते.