कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने येथे दहावी शास्त्रीय सल्लागार समिती बैठक संपन्न
शेवगाव: भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली प्रायोजित श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने यांचे वतीने दहावी शास्त्रीय सल्लागार समिती बैठक दहीगाव-ने येथे संपन्न झाली. संस्थेचे अध्यक्ष मा. आ. डॉ. नरेंद्र घुले पाटील, आय. सी. ए. आर. अटारी झोन-८, पुणे चे संचालक डॉ. एस. के. रॉय, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी चे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरख ससाणे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. सुधाकर बोराळे यांचे प्रमुख मार्गदर्शन या सभेस लाभले.
शास्त्रीय सल्लागार समितीच्या सभेमध्ये कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. कौशिक, कृषिविद्या विभागाचे श्री. नारायण निबे, पिक संरक्षण विभागाचे श्री. माणिक लाखे, उद्यानविद्या विभागाचे श्री. नंदकिशोर दहातोंडे, कृषि अभियांत्रिकी विभागाचे इंजी. राहुल पाटील, पशुविज्ञान विभागाचे डॉ. चंद्रशेखर गवळी, कृषि विस्तार विभागाचे श्री. सचिन बडधे यांनी आपापल्या विभागाचे गत वर्षभरामधील प्रगती अहवालाचे सादरीकरण यावेळी केले. शेतक-यांच्या सामाजिक व आर्थिक परिवर्तनासाठी केव्हीके दहिगाव-ने सदैव प्रयत्नशील असल्याचे डॉ. कौशिक यांनी यावेळी नमूद केले. डॉ. टी. राजेश शास्त्रज्ञ आय.सी.ए.आर.,अटारी, पुणे यांनी कृषि विज्ञान केंद्राचे कामकाज गतिमान पद्धतीने चालण्यासाठी माहिती तंत्रज्ञान साधनांचा वापर व्यापक पद्धतीने करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. डॉ. गोरख ससाणे, विस्तार शिक्षण संचालक यांनी यापुढे ग्रामीण भागातील युवकांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे स्वयंरोजगाराच्या दृष्टीने प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण घ्यावे व विद्यापीठाकडील तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी स्वतःच्या उन्नतीसाठी करावा असे नमूद केले. डॉ. दशरथ दिघे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, अहिल्यानगर यांनी दुधाची उत्पादकता वाढवण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजना याबद्दल चर्चा केली. श्री. पी.एस. लाटे प्रकल्प संचालक, आत्मा, अहिल्यानगर, डॉ. सरोज वाहने, व्यवस्थापक, एनडीडीबी राहुरी सिमेन सेंटर, श्री. संदिप आगवने, जिल्हा रेशीम अधिकारी अहिल्यानगर व डॉ. ज्ञानेश्वर बोरसे, प्रमुख शास्त्रज्ञ, ऊस संशोधन केंद्र, लखनऊचे विभागीय केंद्र, प्रवरानगर यांनी देखील यावेळी चर्चा करून महत्वाच्या सूचना केल्या.
यावेळी श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री. काकासाहेब शिंदे, सचिव इंजी. रवींद्र मोटे, पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिल गडाख, डॉ. बापूसाहेब शिंदे, तालुका कृषि अधिकारी, शेवगाव श्री. अंकुश टकले, शेतकरी प्रतिनिधी श्री. रुस्तुम बाबा नवले, श्री. आप्पासाहेब फटांगरे, श्री. संजय तनपुरे, श्री शंकर जाधव, झाकीर शेख, श्री. बाळासाहेब नवले, केव्हीके दहिगाव-ने चे श्री प्रकाश बहिरट, श्री वैभव नगरकर, श्री. अनिल देशमुख, श्री प्रविण देशमुख उपस्थित होते. डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत केव्हीके दहिगाव-ने प्रक्षेत्रावर उभारलेले जीवामृत, बायोगॅस व देशी गाय गोठा प्रकल्पाचे उद्घाटन यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी प्रक्षेत्र व्यवस्थापक यांनी मान्यवरांना या प्रकल्पाविषयी माहिती दिली. कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने च्या शास्त्रीय सल्लागार समितीचे सदस्य असलेले शेतकरी प्रतिनिधी डॉ. शशिकांत शिंदे, भोसे (पाथर्डी) यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, श्रीमती पुष्पा नवले, भेंडे (नेवासा) यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, श्री. मोहन तुवर, पाचेगाव (नेवासा) यांना कृषिभूषण (सेंद्रिय शेती) मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते मिळाल्याबद्दल तर श्री. दत्तात्रय शेरकर यांना ऊस भूषण कार्यगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मा. आ. डॉ. नरेंद्र घुले पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इंजी. राहुल पाटील यांनी तर आभार श्री. माणिक लाखे यांनी मानले.