आनंत राजे कराड राज्यस्थरीय संघर्ष योद्धा पुरस्काराने सम्मानीत
अहिल्यानगरप्रतिनिधी(व्हिजन 24 न्यूज): लो. वा. शिरसाटवाडी ता. पाथर्डी येथील मुंजाबा बहुउद्देशीय प्रतीष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आनंत राजे कराड यांना बहुभाषीक भाऊ बाबा वंजारी संघ महाराष्ट्र यांच्यावतीने राज्यस्थरीय संघर्ष योद्धा पुरस्काराने नुकतेच बोधेगांव येथे भगवान बाबा मंगल कार्यालयात आयोजीत केलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये संघर्षयोद्धा या पुरस्काराने समाजसेवीका व जेष्ठ नेत्या सुशीलाताई मोराळे व बहुभाषीक भाऊ बाबा वंजारी सेवा संघ महाराष्ट्र अध्यक्षा लक्ष्मीताई गर्कळ व दादासाहेब मुंडे व इतर मान्यवरांच्या हस्ते सम्मानीत करण्यात आले. आनंतराजे कराड यांना संघर्ष योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल शिरसाटवाडी ग्रामस्थ व मुजांबा बहुउद्धेशीय प्रतिष्ठान शिरसाटवाडी व तालुक्यातील त्यांच्या मित्रमंडळीच्या वतीने पुरस्कार मिळाल्याबद्धल अभिनंदन करण्यात आले.