विना परवानगी मद्य विक्रेत्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ४ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर, दि. १९ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कोरडा दिवस (ड्राय डे) कालावधीत १८ आणि १९ नोव्हेंबर या काळात अवैधपणे मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल व ढाबे चालकांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करुन ४ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून १५ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी दिली आहे.
कोरडा दिवस (ड्राय डे) कालावधीत ७ हजार ९७० लिटर रसायन, ३०० लिटर हातभट्टी, १८ बल्क लिटर देशी, ४४.५२. बल्क लिटर विदेशी माल जप्त करण्यात आला आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात कोरडे दिवस जाहीर करण्यात आले असून या दिवशी कोणत्याही प्रकारची अवैध मद्यविक्री होत असल्याचे आढळल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९, व्हॉटस्अप क्रमांक ८४२२००११३३ अथवा ०२४१-२४७०८६० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.