घरगुती पाळल्या जाणाऱ्या मांजरांना मांसाहार देऊन मांसाहारी केलेल्या मांजरांच्या त्रासामुळे नागरिक हैराण
मांसाहारी मांजरांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात वाढली असून त्या मांजरांचा बंदोबस्त करा – ग्रामस्थ
राहुरी: (व्हिजन 24 न्यूज) राहुरी खुर्द मध्ये लोकांनी घरामध्ये घरगुती पाळली जाणारी मांजर ही मांसाहारी करून टाकल्यामुळे मांजर मांसाहारी झाली त्यांची संख्या ही एक-दोन नव्हे तब्बल 15 ते 20 अशी आहे व त्या मांजरांना सकाळ दुपार संध्याकाळ मांसाहार दिला जातो. त्यामध्ये कोंबडीचे पाय, डोके तसेच इतर अवयव असतात मटणाचे तुकडे घेऊन हे मांजरे शेजारी राहणारांच्या घरात घुसतात व खात असतात राहिलेले मटणाचे तुकडे तसेच टाकून निघून जातात व त्यानंतर त्या मटणाच्या तुकड्याला उग्र स्वरूपाचा वास येतो तसेच त्याला मुंग्या लागतात तसेच त्यामध्ये जंतू तयार होतात त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
राहुरी खुर्द ग्रामपंचायत ने याकडे लक्ष देणे गरजेचे असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच ज्या लोकांनी अशा प्रकारचे मांजरे पाळलेली आहेत त्या लोकांना सूचना करावी की त्यांच्या मांजरामुळे इतर लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशी ग्रामस्थांकडून विनंती करण्यात येत आहे.
घरांवरती रात्री अपरात्री मांजरे उड्या मारत असतात त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. तसेच रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना व लहान मुलांना या मांजरांनी चावा घेतलेला आहे. हि बाब गंभीर असून याकडे वन विभागाने लक्ष द्यावे. असे नागरिकांकडून बोंलले जात आहे.
अशाप्रकारे मांजरांचा त्रास हा येथील ग्रामस्थ सहन करत आहेत त्यासाठी राहुरी खुर्द ग्रामपंचायत व वन विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे ज्या मांजराला आपण दूध पाजतो ती मांजरे आज मांसाहारी बनली आहेत ही बाब अत्यंत गंभीर आहे.