शेवगाव (व्हिजन 24 न्यूज) : दि. 15 नोव्हेंबर, शेवगावमध्ये तुरीला सध्या फुलोरा मोठ्या प्रमाणात आल्याने शेतात जणू काही पिवळी चादर अंथरल्यासारखे दिसून आले वजनामुळे तुरीचे झाडे वाकून गेले आहेत. त्यामुळे शेतकरी आनंदी दिसून येत आहे. शेतकरी रब्बी मध्ये घेतलेल्या मुग, उडिद या पिकांच्या जीवावर उसनवारी चुकवतील तसेच लोकांची देणेदारी फेडतील असे वाटत असते; परंतु बरेच वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे रब्बीच्या पिकांमध्ये मुग, उडीदाचे पीक फारच कमी येत असल्याने उडीद, मुगाच्या उत्पन्नातून पेरणीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला होता. परंतु यावर्षी थंडी चांगली असल्याने तुरीचे पीक जोमात आल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक शेतात तुरीच्या झाडाला फुलाने भर आल्याने जणू काही शेतावर पिवळी चादर अंथरली की काय? असे दिसून येत आहे. फुलोऱ्याने भर आल्याने तुरीचे झाड वाकून जात असल्याने यावर्षी तुरीचे पीक जोमात येईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. शेतातील तुरीचे पीक जोमात आल्याचे पाहून शेतकरी सुखावला आहे तुरीला बाजारपेठेत चांगला बाजारभाव येऊन शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक बळ वाढेल म्हणून शेतकरी आनंदी दिसून येत आहे.