ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत युवा नेते अक्षय कर्डिले यांची अपघात ग्रस्तांना तातडीची मदत
राहुरी प्रतिनिधी अक्षय करपे
राहुरी खुर्द येथील नगर – मनमाड रोड येथे आज दुपारी 12 च्या दरम्यान भीषण अपघात झाला यामधे दोन जणांचा दुर्दैवी अंत झाला तर दोघे जखमी झाले आहेत. युवा नेते तथा भाजपा युवा जिल्हाध्यक्ष अक्षय दादा कर्डिले हे राहुरी दौऱ्यावर होते त्यांना माहिती समजताच त्यांनी तातडीने जखमींना राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान युवा नेते अक्षय कर्डिले भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष असून निवडणुकीच्या भारतीय जनता पार्टीचा राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघात एवढा लोड असूनही त्यांनी सर्व कामे बाजूला करून जनतेच्या सेवेला प्राधान्य देत माणुसकीचे दर्शन घडविल्याने राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांचे कौतुक होत आहे. तसेच भारतीय जनता पार्टीचे अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन व माजी मंत्री व महायुतीचे राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचे ते चिरंजीव आहेत.