तालुक्यातील माय बहिणींच्या अविरत सेवेसाठी शिवाजीराव कर्डिले यांना पुन्हा आमदार करणे हाच आमचा निर्धार- तालुक्यातील लाडक्या बहिणी
राहुरी प्रतिनिधी अक्षय करपे
राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघाचा प्रचाराचा धुराळा उडाला असून मात्र लोकांची पसंती भारतीय जनता पार्टी महायुतीची अधिकृत उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या नावालाच मिळताना दिसत आहे.
मागच्या गेल्या पाच वर्षांमध्ये राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघांमध्ये विकासाचा मोठ्या प्रमाणात अभाव निर्माण झाल्याने या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीची अधिकृत उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचाराला सर्वसामान्य जनसामान्य शेतकरी वंचित व महिलांचा प्रतिसाद मिळताना मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.
दरम्यान एकीकडे भारतीय जनता पार्टी कडून महिलांच्या जनकल्याणासाठी मोठ्या प्रमाणात योजना आणल्या जात असताना महाविकास आघाडी कडून मात्र या योजनांना आम्ही निवडून आलो तर बंद करू तिजोरीमध्ये खळखळाट अशा प्रकारच्या जाणून-बुजून माय बहिणींच्या तोंडाशी आलेला घास हिसकावून घेण्याचा प्रयत्न महापाप महाविकास आघाडी कडून केले जाणार आहे यासाठी राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघातील महिलांनी प्रतिज्ञा केली असून त्यांनी आमच्याशी बोलताना सांगितले आहे की भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव कर्डिले या आमच्या भावाला यावेळी विधानसभेत पाठविल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशी भीम प्रतिज्ञा तालुक्यातील माता भगिनींनी केली आहे.
सदर लाडकी बहीण योजना महायुती सरकारने सुरू केल्यापासून राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांनी सातत्याने या योजनेवर टीका केली आहे तसेच लाडक्या बहिणींना हे सर्व पैसे मिळत असताना हे महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधीला खटकत असल्याने राहुरी पाथर्डी मतदारसंघातील सर्व बहिणींनी आता आपले मत कोणाला घ्यायचे आहे याचा विचार प्रामुख्याने केला पाहिजे अशी चर्चा मतदारसंघातील नागरिकांमध्ये होत आहे.