राहुरी पाथर्डी नगर विधानसभेचे मैदान मारण्यासाठी शिवाजीराव कर्डिले सज्ज
राहुरी प्रतिनिधी / अक्षय करपे
राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघासाठी सर्वसामान्यांचे उगवते नेतृत्व कोरोना महामारी काळामध्ये गोरगरिबाला आधार देणारे राहुरीचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले सर्वसामान्यांच्या पाठबळावर ही निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदार संघाचे मैदान मारण्यासाठी शिवाजीराव कर्डिले समर्थक पूर्ण ताकतीने मैदानात उतरले आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले *राहुरी पाथर्डी नगर मतदारसंघातही ऐन हिवाळ्यात राजकीय वातावरण तापले आहे.
विद्यमान अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले तथा माजी आमदार राहुरी नगर पाथर्डी मतदार संघात गेले अनेक वर्षे काम करीत आहेत. 2024 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मतदारसंघात चांगली मोर्चेबांधणीही केली आहे.व युवकांची फळी उभारली आहे. जुन्या जाणत्या लोकांना एकत्रित घेऊन त्यांचेही आशीर्वाद घेतले जात आहेत.व राहुरी पाथर्डी नगर मधील अनेक गावगाड्यातील वाडीवस्तीवर आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह गाठीभेटी घेऊन जोरदार प्रचार चालू केला असून मैदान आपणच मारणार असल्याचे शिवाजीराव कर्डिले यांनी ठणकावून सांगितले.
त्यामुळे राहुरी पाथर्डी नगर मतदारसंघाची यावेळची निवडणूक अतिशय रंगतदार, काट्याची होणार आहे, हे मात्र नक्की