प्रतिनिधी : प्रहार दिव्यांग संघटनेच्या शाखेचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष ऍड. लक्ष्मणराव पोकळे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सचिव हमीदभाई शेख होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पोपटराव शेळके यांनी केले. बायजाबाई जेऊर शाखाध्यक्ष पदी मोहसिन शेख उप अध्यक्षपदी संदीप विटकरयांची निवड करण्यात आली.
यावेळी श्रीगोंदा तालुका अध्यक्ष यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना सप्रेम भेट देण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड लक्ष्मण पोकळे यांनी आपले मनोगतामध्ये पूर्ण जिल्ह्यात गाव तिथे प्रहार दिव्यांग संघटनेची शाखा स्थापन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले, उत्तर जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे म्हणाले प्रहार दिव्यांग संघटनेची स्थापना आदरणीय बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली 2012 मध्ये झाली तेव्हापासून महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळाला. शासनाच्या विविध योजनेची माहीती दिली, जिल्हा सचिव हमीदभाई शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख यांनी शाखा स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक केले. जिल्हा सहसचिव संजय पुंड यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजेंद्र पोकळे, नगर तालुका अध्यक्ष किशोर सुर्यवंशी, राहुरी तालुका संघटक भास्कर दरंदले, देवळाली प्रवरा सचिव सुखदेव किरतने, रघुनाथ धनवडे, झुंबर वाघमारे, रावसाहेब तोडमल, विसवास पाटोळे, प्रभाकर पाटोळे,अयास शेख, सतिष वाघ, सागर खेसे, बहुसंख्य प्रहार सैनिक उपस्थित होते.