राहुरी

राहुरी पोलिसांकडून राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान बनावट नंबर लावून फिरणारी एक मोटरसायकल जप्त व ४१ विना नंबर प्लेट गाड्यांवर दंडात्मक कारवाई

बनावट नंबर प्लेट गाडीस लावून फिरणाऱ्या आरोपीस अटक

राहुरी पोलिसांकडून राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान बनावट नंबर लावून फिरणारी एक मोटरसायकल जप्त व ४१ विना नंबर प्लेट गाड्यांवर दंडात्मक कारवाई 

बनावट नंबर प्लेट गाडीस लावून फिरणाऱ्या आरोपीस अटक

राहुरी : बनावट नंबर प्लेट लावून वाहन विक्री करणाऱ्या मोठ्या टोळीचा छडा लागू शकतो. राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बऱ्याचशा दुचाकी गाड्या ह्या चोरांकडून अल्प दरात विकत घेऊन विना नंबर प्लेट वापरल्या जातात अशी माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशन विना नंबर प्लेट गाड्यांची तपासणी मोहीम हाती घेतली होती. सदर मोहिमेदरम्यान एकूण ४१ दुचाकी वाहने विना नंबर प्लेटची आढळून आली. ४१ वाहनां पैकी ३० कडून १५०००/ रुपये दंड ऑनलाईन पदधतीने पेड करून घेतला आहे.५ वाहनांवर २५००/-रुपये अनपेड दंड टाकण्यात एकूण ३५ वाहनांवर दोन्ही बाजूच्या नंबर प्लेट बसून वाहने मूळ बालकांच्या ताब्यात देण्यात आली. पाच वाहनांची कागदपत्र पडताळणी बाकी असल्याने पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आलेले आहे.

सदर मोहिमेदरम्यान बनावट नंबर प्लेट रजिस्ट्रेशन क्रमांक एम एच १५ बी क्यू ८४८६ ही आरोपी नामे रवींद्र भाऊसाहेब झावरे वय ३३ वर्ष रा. ताहाराबाद तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर याचे ताब्यात मिळून आल्याने त्यास अटक करून मा. न्यायालयापुढे हजर करून बनावट नंबर प्लेट लावलेल्या गाडीबाबत पोलिस हवालदार विकास वैराळ तपास करत आहेत. यापुढेही अशा प्रकारे बनावट नंबर प्लेट लावलेल्या वाहनांचाही पोलीस विभागामार्फत कसोशीने शोध घेण्यात येणार आहे.

राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की आपल्या दुचाकी चार चाकी वाहनांवर पुढील व मागील दोन्ही नंबर प्लेट बसून घ्याव्यात जेणेकरून विनाकारण दंड भरण्याची वेळ येणार नाही. तसेच सर्व नागरिकांनी नंबर प्लेट बसवलेले असल्यास चोरीचे वाहन शोध ही सोपा होईल. सदर चोरीचे वाहन शोध मोहीम ही पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबरमे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रविंद्र पिंगळे, अमोल पवार, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे धर्मराज पाटील, समाधान फडोळ, सुदर्शन बोडखे, विष्णू आहेर साहेब , सहाय्यक फौजदार फुलारी, पो.हेड कॉन्स्टेबल बाबा शेळके, हनुमंत आव्हाड, संदीप ठाणगे, संजय राठोड, सुरज गायकवाड, राहुल यादव, बापू फुलमाळी, सतीश आवारे,पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, प्रमोद ढाकणे, सचिन ताजने, सतीश कुराडे, अंकुश भोसले, जालिंदर धायगुडे, भाऊसाहेब शिरसाट, गणेश लीपणे, समादेशक आरिफ इनामदार तसेच होमगार्ड भागवत तनपुरे, भाऊसाहेब जाधव, यशवंत बाचकर, दीपक जाधव, महेश मस्के, काशिनाथ चव्हाण, संजय ढसाळ, रमेश आघाव, भाऊसाहेब धनेधर, प्रमोद जाधव, संजय इंगळे, ओंकार उंडे, चांगदेव कोबरने, बाळासाहेब वराळे, ऋषिकेश ढगे, गणेश नवले, अशोक मोहिते, काशिनाथ उमाप, विनोद ससाने, शामवेल ससाने, सुफियान पठाण, सिद्धार्थ घोडके, गोरख राऊत, गणेश खरमाळे, आदिनाथ ढोकणे यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
×