शेवगाव तहसीलमध्ये शेतकऱ्यांचा ठिय्या शिवपाणंद रस्ते व शेत रसत्याच्या प्रश्नावर शेतकरी आक्रमण
शेवगाव: शिवपाणंद रस्ते व शेत रस्ते चळवळीचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख शरदराव पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले रवींद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तालुका कृती समितीच्या वतीने शेवगाव तालुक्यातील शिवपाणंद रस्ते व शेत रस्ते खुले करा या मागणी संदर्भात शेवगाव कुषि उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी सभागृहात पासून शेतकऱ्यांनी भव्य दिव्य अशी रॅली काढून शेतीला रस्ता मिळालाच पाहिजे जय जवान जय किसान भारत माता की जय इनक्लाब जिंदाबाद च्या घोषणा देत रॅली शेवगाव तहसील कार्यालयात पोहचली त्यानंतर तीन तास ठिय्या आंदोलना नंतर शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी शिवपाणंद रस्ते व शेत रस्तेसमितीचे प्रमुख शरदराव पवळे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील रस्ते पिडीत शेतकऱ्यांशी संवाद साधून लगेच परिपत्रक काढले जाहीर असे जाहीर केले व तश्या आशयाचे परिपत्रक शेतगाव कृती समिती देऊन परिपत्रक जारी केले.त्या परिपत्रकानुसार भूमी अभिलेख व पोलीस संरक्षणाची फी भरण्याची आवश्यकता नसल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.पुढील चार महिन्यात तालुक्यातील रस्त्याचे प्रलंबित प्रश्नमार्गी काढले जातील व २ ऑक्टोबर महात्मा गांधी गांधीजयंतीच्या पूर्वीच तालुक्यातील गाव पातळीवरीलरस्ते ग्राम समित्या स्थापन केल्या जातील असेही निर्देश परिपत्रकात जारी करण्यात आले. यावेळी रस्ते पिडीत शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या कृती समितीचे राज्य प्रमुख शरदराव पवळे, रवींद्र सानप,पत्रकार शहाराम आगळे, बाळासाहेब शिंदे, दादासाहेब बोडखे, श्यामराव सावंत, शिवाजी रिंधे, भाऊसाहेब सामृत, काकासाहेब हारदास,राजेंद्र फाटके, परमेश्वर मिर्झे,श्रीकांत निकम यांच्यासह तालुक्यातील निसार शेख, शंकर शिदे, आनंद गांधी, सतिष कणगरे, भाऊसाहेब आर्ले, कचरू इसरवाडे, हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद करत तत्काळ परिपत्रक जारी केले.याबद्दल कृती समितीच्या वतीने राज्याचे प्रमुख शरद पवळे यांनी शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांचा सत्कार केला.
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हासू येईलअसे काम शिव पानंद रस्ता व शेत रस्ता चळवळ राज्यभर काम करत आहे. त्या चळवळीला आपण गतिमान करण्यासाठी तात्काळ रस्ते खुले करावे. रस्त्यामुळे ग्रामीण भागात फार बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.राज्यातील अनेक जिल्ह्यामधून प्रशासकीय पातळीवर प्रशंसनीय काम होत आहे. तसे काम शेवगाव तालुक्यातील व्हावे अशी शेतकऱ्यांच्या वतीने आम्हाला अपेक्षा आहे. या चळवळीला प्रशासकीय पातळीवर गती मिळाल्यास शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर लवकरच हासू पहावयास मिळेल.
शरदराव पवळे राज्यप्रमुख शिवपाणंद रस्ते व कृती समिती प्रमुख