Uncategorizedकृषीराहुरी

परळी येथील कृषि प्रदर्शनात महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दालनास शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद

व्हिजन 24 न्यूज

परळी येथील कृषि प्रदर्शनात महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दालनास शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद

राहुरी विद्यापीठ, दि. 23 ऑगस्ट, 2024 बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे दि. 21 ऑगस्ट, 2024 पासून सुरु झालेल्या कृषि महोत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या कृषि प्रदर्शनात राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या प्रदर्शन दालनास शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या नेतृत्वाखाली हे प्रदर्शन दालन उभारण्यात आले आहे. यामध्ये विस्तार शिक्षण संचालनालय, राष्ट्रीय बियाणे प्रकल्पाचा बियाणे विभाग, उद्यानविद्या विभाग, वनस्पतीशास्त्र विभाग, कृषि विद्या विभाग, कास्ट प्रकल्प, देशी गाय संशोधन प्रकल्प, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषि किटकशास्त्र विभाग, वनस्पती रोगशास्त्र व कृषि अणुजीवशास्त्र विभाग, मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग, कृषि अर्थशास्त्र विभाग, आंतरविद्याशाखा व जलसिंचन विभाग, कृषि अवजारे विभाग, कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, धुळे व जळगांव या केंद्रांचा यामध्ये समावेश आहे. विद्यापीठाच्या ड्रोनच्या स्टॉलला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करून माहिती घेतली.

विद्यापीठाच्या प्रदर्शन दालनास राज्याचे कृषिमंत्री मा. ना. श्री. धनंजय मुंडे यांनी भेट दिली तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख व परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी भेट दिली. याप्रसंगी डॉ. विठ्ठल शिर्के यांनी पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने विकसित केलेल्या उसाच्या विविध वाणांबद्दलची माहिती त्यांना दिली. यावेळी डॉ. गोरक्ष ससाणे, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे प्रमुख डॉ. दत्तात्रय पाचारणे, जनसंपर्क अधिकारी डॉ. गोकुळ वामन,पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. कैलास काळे व वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. दत्तात्रय थोरवे उपस्थित होते. विद्यापीठाच्या प्रदर्शन दालनास भेट देणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत असून राहुरी कृषि विद्यापीठाचे हे प्रदर्शनाचे दालन शेतकरी बांधवांची पहिली पसंती असल्याचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
×