गोकुळ भाऊ दौंड यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी, गोकुळ आंधळे मित्रपरिवार महाराष्ट्र राज्याच्या वतीने एक लाख 51 हजार रुपये देण्याचा महा मेरू उचलला आहे
जिल्हा प्रतिनिधी मधुकर केदार
गोकुळ भाऊ दौंड यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी, गोकुळ आंधळे मित्रपरिवार महाराष्ट्र राज्याच्या वतीने एक लाख 51 हजार रुपये देण्याचा महा मेरू उचलला
पाथर्डी तालुक्याचे भूमिपुत्र गोकुळ भाऊ दौंड (भाजपा जिल्हा अध्यक्ष ओबीसी मोर्चा अ.नगर) यांचे विश्वासू नावकरी गोकुळ आंधळे (युवक जिल्हाध्यक्ष अ.नगर कानसा वारणा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य) यांनी भाजपा जिल्हा अध्यक्ष ओबीसी मोर्चा अ. नगर गोकुळ भाऊ दौंड यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी गोकुळ आंधळे मित्रपरिवार महाराष्ट्र राज्याच्या वतीने एक लाख 51 हजार लोकवर्गणी करून देण्याचा निश्चय केलेला आहे, भाजपा पक्षाचे येणाऱ्या विधानसभेचे आमदारकीचे तिकीट मिळावे अशी मागणी केली आहे.
गोकुळ भाऊ दौंड हे गेली 25, 30 वर्षापासून भाजपा पक्षाशी एकनिष्ठ आहे. भाजपा पक्षाच जिल्हाभर काम करतात पाथर्डी पंचायत समिती सभापतीच्या पदाच्या माध्यमातून पाथर्डी तालुक्यातील गोरगरीब जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचल्या, शेवगाव पाथर्डी तालुक्यामध्ये खूप मोठा दांडगा जनसंपर्क आहे, शेवगाव पाथर्डी तालुक्यामधील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या सुखा दुःखात इतर कोणताही कार्यक्रम असो अडचण असो काम असो ते काम करतात, गेली पाच वर्षापासून शेवगाव पाथर्डी मतदारसंघ पायाला भिंगरी लावून वाडी वस्ती तांड्यावर जाऊन पिंजून काढलेला आहे. प्रत्येक ठिकाणच्या समस्या त्यांना माहित आहे, कोरोना काळातील त्यांचा काम पाहता पाथर्डी तालुक्यामध्ये कोविड सेंटर चालू केले कोविड सेंटरच्या माध्यमातून चारशे ते पाचशे रुग्णांना जीवदान देण्याच काम गोकुळ भाऊ दौंड यांनी केले, शेवगाव पाथर्डी तालुक्यामधील सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न तळागाळातील प्रश्न त्यांच्या दारापर्यंत जाऊन समस्या जाणून घेतात, गेली 60 वर्षापासून राजळे आणि ढाकणे घरामध्ये सत्ता होती आता शेवगाव पाथर्डी मतदारसंघाला सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य घरातील आमदार म्हणून सर्वात जास्त पसंती गोकुळ भाऊ दौंड यांना आहे, खरंतर म्हणजे आमच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघाला सर्वात मोठे दोन प्रश्न आहेत एक रोजगार आणि दुसरा पाणी प्रश्न रोजगारासाठी एमआयडीसी आणि पाणी प्रश्न गोकुळ भाऊ हे सोडवतील असा विश्वास शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील जनतेला आहे, तरी भाजपा पक्षाने गोकुळ भाऊ दौंड यांच्या कामाची दखल घेऊन आणि शेवगाव पाथर्डी तालुक्यामधील जनतेचे प्रश्न व जनतेचा कौल पाहता गोकुळ भाऊ दौंड यांना येणाऱ्या विधानसभेचे तिकीट देण्यात यावे, हे सर्व काम गोकुळ भाऊ दौंड यांनी केले म्हणून मला विश्वास आहे.