गोकुळ दौंड यांना भाजपची उमेदवारी मिळावीयासाठी सविता साळवे यांचा मोहटा देवीला नवस
पाथर्डी : भाजपाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांना शेवगाव पाथर्डी मतदारसंघाची भाजपा पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी पाथर्डी तालुक्यातील हत्राळ ग्रामपंचायतच्या उपसरपंच सविता साळवे यांनी मोहटादेवीला नवस केला आहे.
गोकुळ दौंड गेल्या पंधरा वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तीन वेळा सोनोशीच्या ग्रामपंचायत सरपंच पदी त्यांची निवड झाली. त्या काळात त्यांनी अतिशय पारदर्शक व लोकहीताचे कामे केल्यामुळे त्यांच्या पत्नी सुनिता दौंड यांना भाजपाची उमेदवारी मिळाली. मिळालेल्या संधीचे सोने करत गोकुळ दौंड यांनी केलेले विकास कामे मतदारापुढे मांडली, मतदारांनीही त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांच्या पत्नी सौ. दौंड यांना भरघोस मतांनी विजयी केले. त्यानंतर पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर गोकुळ दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिता दौंड यांनी अतिशय पारदर्शक लोकाभिमुख कार्य करून तालुक्याच्या राजकारणात आपले स्थान निर्माण केले. येथील जनतेवर त्यांची वेगळी छाप पडली. जनता जनार्दन मायबाप हेच ध्येय समजून त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक लोक उपयोगी योजना राबवल्या त्याचा तालुक्यातील जनतेला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. अतिशय पारदर्शकपणे व पोटतीडकीने लोकांच्यासाठी त्यांनी अतिशय उत्कृष्ट कारभार केल्यामुळे लोकांच्या मनात त्यांचे विषयी आदराची भावना निर्माण झाली.
पंचायत समितीची आपली कारकीर्द संपल्यानंतर ही सामाजिक कार्यात कोणतेही पद नसताना नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये पूर्ण वेळ त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्यामुळे अनेकांना संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, रुग्णांना मोठ्या दवाखान्यामध्ये पैशाची सूट, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ,गोरगरिबांना मदत हे कार्य त्यांचे अविरतपणे सुरू आहे. अनेकांना विविध शासकीय योजनेसाठी कागदपत्र अर्ज भरून देणे यासाठी त्यांनी मदत केंद्र कार्यालय सुरू केले आहे. सध्या सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पूर्ण अर्ज ऑनलाईन भरण्याचे काम सुद्धा करत आहेत . त्यांच्या या सर्व सामाजिक कार्यामुळे तालुक्यातील जनतेत त्यांचे विशेष स्थान निर्माण झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गोकुळ दौंड यांना भाजपा पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी हत्राळ च्या उपसरपंच कविता साळवे यांनी मोहटादेवीला नवस बोलला आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे अडीअडचणी दूर करणारे गोकुळ दौंड च भावी आमदार व्हावेत अशी मोहटादेवी चरणी उपसरपंच साळवे यांनी प्रार्थना केली आहे.