श्री गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आव्हाने बु.
लोकनेते स्व. मारूतराव घुले पाटील यांच्या २२ व्या स्मृती दिनानिमित्त स्व. मारूतराव घुले पाटील फौंडेशन शेवगाव-पाथर्डी आयोजित-घुले पाटील शालेय युवा महोत्सव या अंतर्गत रंगभरण, निबंध, वकृत्व अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाची सुरुवात स्व. मारूतराव घुले पाटील साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या स्पर्धेत आव्हाने बु. केंद्र आणि. वाघोली केंद्र या दोन केंद्रातील समाविष्ट जि. प. प्रा. शाळा व हायस्कूल अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. के. के. जाधव सर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री. रमेश लांडे सर, जेष्ठ शिक्षक श्री शेषराव आव्हाड सर, श्री.जयराम नांगरे सर विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.