ना.बच्चुभाऊ कडु यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, वृक्षारोपण विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
राहुरी प्रतिनिधी/ रावसाहेब पाटोळे
ना.बच्चुभाऊ कडु यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, वृक्षारोपण विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप उद
राहुरी प्रतिनिधी – दिव्यांगाचे आधारस्तंभ दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ना. बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस स्वाभिमान दिन म्हणून पूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना व दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी यांच्या वतीने रक्तदान शिबीर, वृक्षारोपण गरीब विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू चे वाटप करण्यात आले. रोडरी क्लब ब्लड बँक राहुरी या ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आले. गाडगेबाबा आश्रम शाळा व जोगेश्वरी आखाडा येतील नूतन मराठी शाळा नंबर 2 येथील गरीब विद्यार्थ्यांना वह्या, पाण्याची बाटली, कंपास, वाटप करण्यात आले.
तालुक्यातील दिव्यांग पदाधिकाऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला . कार्यक्रमाचे अध्यक्ष लाईफ इन मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल चे डॉ. मुकेश साळी होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले. यामध्ये त्यांनी सांगितले 2013 पासून प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यामध्ये दिव्यांग असणारे दिघे पाटील व प्रवीण मेहत्रे, दिलीप काळे प्रत्येक वेळी रक्तदान करतात. डॉ. मुकेश साळी यांनी दिव्यांग शक्ती सेवा संस्थेस पाच हजार रुपयाची देणगी दिली. दिव्यांग संघटनेच्या कामाचे कौतुक केले लाईफ इन मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल राहुरी या ठिकाणी दिव्यांगा च्या उपचारात विशेष सवलत देण्याचे जाहीर केले. तसेच वृक्षरोपण शिबिर घेण्यात आले.
वरील कार्यक्रम पार पाडण्यासाठी रोटरी क्लब ब्लड बँकेचे अध्यक्ष डॉ. जयंत कुलकर्णी डॉ. मेळवणे गाडगेबाबा आश्रम शाळेचे संचालिका भारती ताई खिलारी, मुख्याध्यापक मिलिंद गुजरे सर, नूतन मराठी शाळा नंबर 2 चे मुख्याध्यापक मच्छिंद्र लोखंडे सर , जिल्हाअध्यक्ष मधुकर घाडगे, जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, राहुरी तालुका अध्यक्ष योगेश लबडे, तालुका महिला अध्यक्षा सौ छायाताई हारदे, तालुका सल्लागार बाबुराव शिंदे सर, तालुका सचिव दत्तात्रय खेमनर, उपाध्यक्ष विठ्ठल पांडे, तालुका संपर्क प्रमुख रवींद्र भुजाडी , राहुरी नानासाहेब शिंदे, जुबेर मुसनी, सतीश तरवडे, बाळासाहेब तरोडे, अनामिका हारेल मॅडम, इंद्रायनी पवार, राजेंद्र सोनवने, सुखदेव किर्तने, शशिकांत कुऱ्हे, भारत आढाव, संजय देवरे, विजय म्हसे, जालिंदर हिवाळे, यासीन भाई देशमुख, सुरेश दानवे, शिवाजी जाधव, दर्शनलाल विजन, रवींद्र उगलमुगले इत्यादी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले होते.