दिव्यांग स्वाभिमानदिनानिमित्त विविध शिबिराचे आयोजन – मधुकर घाडगे
राहुरी प्रतिनिधी – शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी सकाळी 9:00 वाजता रोटरी क्लब ब्लड बँक राहुरी या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना अध्यक्ष दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य ना. बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस दिव्यांग स्वाभिमान दिनानिमित्ताने “भव्य रक्तदान शिबिर”. गरीब विद्यार्थ्यांसाठी वह्या व शालेय उपयोगी वस्तू संकलित करून त्याचे वाटप त्याचबरोबर वृक्षरोपण शिबिर राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना व दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी यांच्या वतीने आयोजित केले आहे.
गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात रक्ताची खूप कमतरता आहे म्हणून बच्चुभाऊ कडू यांनी 31 मे ते ते 5 जुलै रक्तदान शिबिर घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते रक्तदान हे जीवदान आहे जास्तीत जास्त तरुण बांधवांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देण्यात यावा असे आवाहन प्रहार जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केली. यावेळी जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे तालुकाध्यक्ष योगेश लबडे महिला तालुकाध्यक्ष छायाताई हारदे तालुका संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी तालुका सल्लागार बाबुराव शिंदे सर तालुका कार्याध्यक्ष सुरेश दानवे, तालुका सचिव दत्तात्रय खेमनर तालुका उपाध्यक्ष विठ्ठल पांडे तालुका उपाध्यक्ष माणिक भाऊ तारडे पाटील तालुका संघटक राजेंद्र आघाव ह भ प नानासाहेब शिंदे भास्कर दरंदले उपस्थित होते.