जि.प.शाळा बाभुळगाव येथे शाळा प्रवेशोत्सव व पाठ्यपुस्तक वाटप
राहुरी प्रतिनिधी – नवीन शैक्षणीक वर्षाच्या पहिल्या दिवशी बाभुळगाव शाळेत पहिलीत दाखल होणा-या नवागतांचे मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. उपशिक्षणाधिकारी श्री सरवदे एस्. के. यावेळी जि.प.अ.नगर वतीने उपस्थित होते. प्रभातफेरीने नवागतांची मिरवणूक काढण्यात आली. औक्षण करून व गुलाबपुष्प, पुस्तके देऊन मुलांचे स्वागत करण्यात आले.
गावचे सरपंच श्री. गोरक्षनाथ गि-हे, शालेय व्यवस्थापन चे अध्यक्ष दत्तात्रय कजबे, उपाध्यक्ष बाळासाहेब थोरात, रावसाहेब पाटोळे, अरूण पाटोळे, राजेंद्र गि-हे, साईनाथ कदम व पहिलीतील मुलांचे पालक यावेळी उपस्थित होते. शालेय परिसर व इमारत आणि स्वच्छतेबाबत उपशिक्षणाधिकारी साहेबांनी समाधान व्यक्त केले आणि ग्रामस्थ, पालक व ग्रामपंचायतीच्या सहकार्याचे कौतुक केले.
शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी या मेळाव्यासाठी परिश्रम घेऊन नियोजन केले.