राहुरी येथे दिशाशक्ती मीडिया समूहाच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न
राहुरी – महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील डॉ.आण्णासाहेब शिंदे सभागृह येथे दिशाशक्ती मीडिया समूहाच्यावतीने राज्यातील वैद्यकीय, प्रशासकीय, सहकार, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, कृषी, पत्रकारिता, आरोग्य, अध्यात्मिक, पर्यावरण आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व मान्यवर व्यक्तींच्या विशेष कार्य सन्मान करून भावी वाटचालीस तसेच उल्लेखनीय कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळण्यासाठी दिशा शक्ती मीडिया समूहाच्यावतीने शनिवार दि. ८ जून रोजी राज्यस्तरीय पुरस्कारराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रम हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील डॉ.आण्णासाहेब शिंदे सभागृहात हा सोहळा नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन दिशाशक्ती मीडिया समूहाचे कार्यकारी संपादक रमेश खेमनर यांनी केले होते.
या कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील व विविध जिल्ह्यातील पुरस्कारार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पै. रावसाहेब (नाना) खेवरे जिल्हाध्यक्ष शिवसेना (उ.बा.ठा.) शरद बाचकर प.महा. अध्यक्ष रासप, डॉ. अण्णासाहेब बाचकर माजी उपसभापती कृ.उ.बा.स., राहुरी, श्री. विजयराव तमनर जिल्हा अध्यक्ष यशवंत सेना, गोरक्षनाथ शेटे सुरक्षा अधिकारी, रामदास बाचकर संचालक कृ.उ.बा.स., राहुरी, मधुकर घाडगे दिव्यांग प्रहार जिल्हा अध्यक्ष, मा. सरपंच ज्ञानेश्वर बाचकर, सचिन कोळपे, उमेश बाचकर, दिशाशक्ती मीडिया समूहाचे संपादक बाळकृष्ण कोकाटे, आयोजक व कार्यकारी संपादक रमेश खेमनर, उप संपादक इनायत अत्तार, गंगासागर पोकळे, प्रमोद डफळ, वसंत रांधवण, युवा ग्रामीण पत्रकार संघांचे नाशिक विभागीय अध्यक्ष शरद तांबे पाटील, जिल्हा सचिव बाळकृष्ण भोसले, पत्रकार आर. आर.जाधव, राजेंद्र म्हसे, राजेंद्र पवार, शरद पाचारणे, मनोज साळवे, कृष्णा गायकवाड, सचिन पवार, त्याचप्रमाणे राज्यातून विविध क्षेत्रातून आलेले पुरस्कार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संपादक बाळकृष्ण कोकाटे यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ व बी.पी.एस. न्यूज व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे मोलाचे सहकार्य लाभले.