छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्यभिषेकाच्या अनुसंघाने शरद डोंगरे आणि अहिल्यानगर सायकल संघाने २ जून पहाटे 4:30 ला अहिल्यानगर येथून सायकल वारी आरंभ करून सुपा, शिरूर, येरवडा, डेक्कन, कोथरूढ़, पिरुंगुट , पौड, मुलशी , विले एमआईडीसी पार करुण कड़ापे गावात पहिला मुक्काम केला .
तदपच्छात दूसरा दिवस
3 जून ला राहिलेला प्रवास आरंभ करून कड़ापे , पलस गांव घाट पाचड़ आणि आतुरता संपवून “रायगढ़” मध्ये सकाळच्या नऊ वाजून 45 मिनिटांनी आनंद जल्लोष साजरा केला, त्या नंतर सकाळी दहा वाजता रायगढ़ किल्ले चढ़ायला ला प्रारंभ केला. शरद डोंगरे यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल डोंगरे प्राइड येथे यश फाउंडेशन च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला प्रसंगी दरेवाडी ग्रामपंचायतचे सदस्य विजुभाऊ करंडे, ले. कर्नल सर्जेराव नागरे, यश फाउंडेशनचे संस्थापक सचिव संजय डोंगरे, राजूभाऊ बेरड, कॅप्टन तांदळे साहेब, बळीराम नागरे, डॉक्टर संतोष पवार, अक्षय मस्के, तेजस जाधव, विनय मल्होत्रा अनिल कुमार अविनाश कांबळे सुभाष कांबळे चि. सोहम सौम्या शिवांश आदी उपस्थित होते.