नेवासा प्रतिनिधी – वन ज्योत फाऊंडेशन चे संस्थापक कमलेश बाबासाहेब नवले यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन सन 2024 चा एस फोर सोल्यूशन्स संस्था महाराष्ट्र राज्य च्या वतीने साहित्यरत्न पुरस्कार दिला असून ते नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील रहिवासी आहेत.मागील वर्षापासून सातत्याने लेखन करून मराठी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान केल्याबद्दल त्यांना साहित्यरत्न पुरस्कार देण्यात आला आहे.
एस फोर सोल्यूशन्स संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा साहित्यरत्न 2024 पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. अशी माहिती एस् फोर सोल्यूशन्स संस्था च्या पदअधिकारी यांनी दिली आहे. लेखक कमलेश नवले पाटील यांनी जीवन ज्योत फाऊंडेशन च्या सर्व पदआधिकारी व एस फोर सोल्यूशन्स संस्था महाराष्ट्र राज्य चे संचालक मंडळाचे आभार मानले आहे. लेखक कमलेश नवले पाटील यांना मिळालेल्या साहित्यरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.