अशोकराव देवढे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने-जोहरापूर ग्रामस्थ्यांकडून वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा.!
जिल्हा प्रतिनिधी :मधुकर केदार
अशोकराव देवढे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने-जोहरापूर ग्रामस्थ्यांकडून वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा.!
आज जोहारपूरचे माजी सरपंच, समाजसेवेचा वसा कायम अंगीकरलेलं उमदं व्यतिमत्व म्हणजे अशोकराव देवढे यांचा 40वा वाढदिवस.
अगदी लहानपणीच वडीलांच छत्र हरवल्यामुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहावं लागलं. अतिशय अल्पवयात घराची जिम्मेदारी डोक्यावर घ्यावी लागली.भायगावचे मामा आढाव परिवार विशेष म्हणजे स्वर्गीय कर्नल पंढरीनाथ आढाव साहेब, यांच्या सहवासात बरेच लहानपण गेले .अनेक सुख दुःख घरातच अनुभवायला मिळाल्याने, दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव कायम असल्याने वेळप्रसंगी जशी गरज असेल तशी मदत जोहरापूर- भातकुडगाव पंचक्रोशीत करत राहिले. पंचकृषीतीलआजारी माणसं स्वतः च्या गाडीने दवाखान्यात पोचवणे, अशिक्षितांनाची शासकीय अडलेली कामे स्वतः च्या ओळखीने करवून घेणे. अशी अनेक कामे निःस्वार्थपणे केलेली आहेत.
अतिशय बिकट परिस्थितीतून सुरू झालेल्या जीवनाच्या प्रवासात,पुढे 2012-13 ला जोहरापूरचे सरपंच पद त्यांनी भूसवले . पुढे पाणी अडवा पाणी जिरवा सारख्या अनेक योजनेत सक्रिय सहभाग घेतला. शेतकऱ्यांसाठी दिल्ली पर्यंतच्या मोर्चात सहभाग , शेवगाव तालुका माजी सैनिक सन्मान सोहळ्याचे आयोजन, मराठा मोर्चामध्ये सात दिवस आमरण उपोषण, यश फाउंडेशन संचालित विविध कार्यक्रमात सक्रिय सहभाग, अशी अनेक कामे निस्पृहपणे कायम सुरु असणाऱ्या, समाज कार्याचा वसा कायम तेवत ठेवणाऱ्या या व्यक्तिमत्वास समस्त जोहरापूर ग्रामस्थ्यांकडून वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा.!