क्राईम
महिला व तिच्या मुलाला मारहाण करून दागिने लुटणाऱ्या 4 आरोपींना तात्काळ अटक व चार दिवस पोलीस कस्टडी
व्हिजन 24 न्यूज
महिला व तिच्या मुलाला मारहाण करून दागिने लुटणाऱ्या 4 आरोपींना तात्काळ अटक व चार दिवस पोलीस कस्टडी
राहुरी : दिनांक 12 एप्रिल 2024, राहुरी पोलीस ठाणे गुरनं ४३२/२०२४ भादवि कलम ३२७, १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे दि. ११/४/२०२४ दाखल गुन्हेतील फिर्यादी सौ बेबी अरु शिंदे वय ४० वर्ष,रा डिग्रस ता. राहुरी यांनी राहुरी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली असून आरोपी नामे १)विजय धर्मा माळी, २)सोमनाथ अर्जुन बर्डे ३)लहु लहानु गायकवाड ४)सोमनाथ बंडु बर्डे ५)सुरेश नवनाथ बर्डे ६)हरी धर्मा माळी ७)अर्जुन बर्डे(पुर्ण नाव माहिती नाही) ८) अशोक लहानु गायकवाड सर्व रा दिग्रस ता राहुरी यांनी फिर्यादी व तिची भाची अशा दोघी दिग्रस यात्रेत खरेदी करण्यासाठी गेल्या असता नमुद आरोपीतांनी गैर कायद्याची मंडळी जमवुन फिर्यादी व भाची तसेच नातेवाईकांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन फिर्यादीच गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसुत्र बळजबरीने तोडुन नेले आहे वैगेर मजकुराच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील आरोपी १ )लहु लहानु गायकवाड वय २२ वर्ष २) अशोक लहानु गायकवाड वय २४ वर्ष ३) सुरेश नवनाथ बर्डे वय २४ वर्ष ४)अर्जुन आमृता माळी वय ४० वर्ष सर्व रा दिग्रस ता राहुरी यांना दिनांक ११/४/२०२४ रोजी अटक करण्यात आली असून मा. हुजूर कोर्टाने चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे. नमूद गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक गणेश सानप हे करीत आहेत. सदर गुन्ह्यातील फरार आरोपीचा अधिक शोध घेत आहोत.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री. वैभव कलुबर्मे सो. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि. अहमदनगर, श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो. नि. संजय आर. ठेंगे यांचे नेतृत्वात पोसई धर्मराज पाटील, सफौ औटी, पोना गणेश सानप, पोकाँ भगवान थोरात, पोकाँ सागर नवले, पोकाँ गणेश लिपणे यांनी केली आहे
पुढील तपास पो हवा गणेश सानप करत आहे.
( संजय आर.ठेंगे )
पोलीस निरीक्षक
राहुरी पोलीस स्टेशन