मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत मृणाल फसले राज्य गुणवत्ता यादीत
व्हिजन 24 न्यूज
राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव- शे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु. मृणाल ज्ञानेश्वर फसले हिने घवघवीत यश संपादित केले. मंथन पब्लिकेशन द्वारा राज्यस्तरावर प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ढोरजळगाव- शे जिल्हा परिषद शाळेतील इ. २री ची विद्यार्थिनी कु. मृणाल ज्ञानेश्वर फसले हिने १५० पैकी १३६ गुण मिळवीत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत ८ वा तर जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक पटकावला. या यशामध्ये मृणालला मुख्याध्यापक गोरक्षनाथ दुसुंगे, वर्गशिक्षिका सिंधुताई देवकर, गोरक्ष आव्हाड, प्रमोद देशमुख यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत ग्रामीण भागातून नाव मिळवल्याबद्दल शेवगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीम. तृप्ती कोलते, शिक्षण विस्तार अधिकारी एकनाथ पटेकर, विस्तारधिकारी, शैलजा राऊळ, डॉ. शंकर गाडेकर, केंद्रप्रमुख सुभाष नन्नवरे, कारभारी गरड, सुनील पायमोडे आदींनी मृणालचे अभिनंदन केले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी शेषराव गिऱ्हे, दिगंबर साबळे, संभाजी फसले, विकास देशमुख, कैलास देशमुख, ज्ञानेश्वर फसले, डॉ. प्रदीप पाटेकर, हसन शेख, अविनाश पाटेकर, संभाजी देशमुख, रवींद्र डाके, संजय गिऱ्हे, ज्ञानेश्वर गिऱ्हे, कैलास पाटेकर, बाळासाहेब खवले, अजय साबळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.