बस मध्ये महिलेचे बळजबरीने मंगळसूत्र चोरणाऱ्या दोन महिला आरोपींना अटक
राहुरी – दि. ०२/०३/२०२४ रोजी फिर्यादी महिला तिच्या आईला सोडण्यासाठी कोल्हार वरून बीड कडे बसने जात असताना अनोळखी तीन महिलांनी फिर्यादी महिलेस लोटला धक्काबुक्की करून तिच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे मनी मंगळसूत्र व पैसे बळजबरीने चोरी केल्याने अनोळखी तीन महिला विरुद्ध राहुरी पोलीस ठाणे येथे दि. ०३/०३/२०२४ गुन्हा क्रमांक २३५/२०२४ भादवि कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास पोउपनि.हे करत होते त्यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीवरून सापळा रचुन सदर महिला आरोपी क्र. १) पूजा आकाश रोकडे राहणार श्रीरामपूर, २) संगीता जीवन लोंढे राहणार श्रीरामपूर यांना दि. ०२/०३/२०२४ रोजी शिताफिने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून, सदर महिला आरोपींना माननीय न्यायालय यांनी दिनांक १०/०४/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर सदर गुन्ह्यात महिला आरोपीने बळजबरी चोरलेली रोख रक्कम पोलिसां कडून जप्त करण्यात आली आहे .सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक धर्मराज पाटील करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सो, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. वैभव कलुबर्मे सो, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. बसवराज शिवपुजे सो, यांचे मार्गदर्शना खाली प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोउपनि. धर्मराज पाटील, पोहेकॉ/ सुरज गायकवाड, पोहेकॉ/ राहुल यादव,पोहेकॉ. अशोक शिंदे,पोना./ गणेश सानप, पोना./उत्तरेश्वर मोराळे,पोकॉ./ गणेश लिपणे, पोकॉ./ प्रमोद ढाकणे,पोकॉ./ नदीम शेख, पो.कॉ/ अंकुश भोसले,मपोकॉ.वृषाली कुसळकर, पोलीस नाईक सचिन धनाड , अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यांनी केली आहे.