महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र राजेश्वर देवस्थान राहुरी खुर्द येथे महाशिवरात्र उत्सव संपन्न
व्हिजन २४ न्यूज
महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र राजेश्वर देवस्थान राहुरी खुर्द येथे महाशिवरात्र उत्सव संपन्न
राहुरी खुर्द : महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र राजेश्वर देवस्थान राहुरी खुर्द येथील मंदिरात दर्शनाकरीता भाविकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र राजेश्वर या ठिकाणी हजारो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. पहाटे पासूनच राहुरी तालुक्यामधून आलेल्या भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी होती. सालाबादप्रमाणे यावर्षी ही सकाळी ८.०० वाजता पुणतांबा येथून आणलेल्या पवित्र गंगेच्या पाण्याच्या कावड्यांची मिरवणूक काढण्यात आली व श्री क्षेत्र राजेश्वर यांना ते पाणी वाहण्यात आले. रात्री ८ ते पहाटे ५ वाजेपर्यंत एकतारी भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला.
दरवर्षीप्रमाणे प्रविण मधुकर उदमले यांच्या तर्फे श्री राज राजेश्वर महादेव यांचा महारुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर भाविक भक्तांना शाबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले. शनिवारी दि. ०९/०३/२०२४ रोजी सकाळी ९.०० ते १.०० या वेळेत ह. भ. प. हेमलताताई महाराज पिंगळे (बल्हेगाव, येवला, जि. नाशिक) यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यांना पंचकोशितील सर्व वारकरी संप्रदाय व टाळकरी यांनी उत्तम अशी साथ दिली. त्यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्त व तरुण मंडळ तसेच राहुरी खुर्द मधील भाविक भक्त यांनी अनमोल सहकार्य केले.