अहिल्यानगर

माणसांच्या जगण्याची सुसंगत साहित्य मनाला भिडते : कवी चंद्रकांत पालवे

Vision24news

माणसांच्या जगण्याची सुसंगत साहित्य मनाला भिडते : कवी चंद्रकांत पालवे

अहमदनगर – माणसाच्या जगण्याशी सुसंगत कविता लिहिली तर ती अंतर्मनाला भिडते, असे साहित्य आता खूप कमी निर्माण होत असून कवी लेखकांनीही आपली आपले वाचन वाढवायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांनी केले.  उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित अहमदनगर ग्रंथोत्सव 2023 च्या काव्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

यावेळी विचारपीठावर ज्येष्ठ कवी प्रा.शशिकांत शिंदे,शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक, सचिव सुनील गोसावी, लेखिका प्रा. मेधाताई काळे, प्रा.डॉ. मच्छिंद्र मालुंजकर उपस्थित होते प्रभारी ग्रंथालय संचालक तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी सर्व कवींचे ग्रंथ व सहभाग प्रमाणपत्र देवून स्वागत केले.

पुढे बोलताना कवी चंद्रकांत पालवे म्हणाले की, माणसांचे जगणे सुसहाय्य करणारे साहित्य खरे साहित्य असते,त्यातील रचना, कथा,कविता मनाला भिडतात म्हणूनच ते साहित्य सर्वश्रेष्ठ साहित्य असते.नव्या पिढीने असे सुसंगत साहित्य निर्माण करायला हवे.
प्रा.शशिकांत शिंदे म्हणाले की, नव्याने लिहिणाऱ्या कवींना मार्गदर्शक ठरेल अशा कार्यक्रमाचे आयोजन व्हायलाच हवे, मानव केंद्रित व माणुसकी जपणारे साहित्य निर्माण व्हायला हवे.

सुनील गोसावी यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन ग्रंथोत्सवात आयोजित काव्यसंमेलनातील कवींच्या पाठीवर शासकीय थाप पडत असल्याचे नमूद केले.

यावेळी कवयित्री शर्मिला गोसावी यांनी सूत्रसंचालन केलेल्या काव्यसंमेलनात एम.पी. दिवाण-पावसावरील कविता,दशरथ खोसे-आठवणी, सरोज आल्हाट-कवितेच्या आठवणी,स्वाती ठुबे-पाऊज जन्मलाकी,सुजाता पुरी-पुस्तकांची मैत्री, वर्षा भोईटे-शक्ति स्वरुपा, सुरेखा घोलप-,शामा मंडलिक, अरविंद ब्राह्मणे-कविततेची वाट,प्रमोद येवले-आरक्षण, बबनराव गिरी-भाषासमृध्दी या काव्यरचना सादर केल्या. काव्यसंमेलनास सेवानिवृत्त अधिकारी दत्ता कडू पाटील,भाऊसाहेब सावंत, तारकराम झावरे,संभाजी वाळके, जगन्नाथ गोसावी, गणेश भगत,रवींद्र सातपुते,नाना डोंगरे, जालिंदर बोरुडे,नवगिरे गुरुजी, कैलास बुधवंत, सय्यद सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी करून शेवटी आभार मानले. जिल्हाभरातून आलेले वाचनालयाचे पदाधिकारी, साहित्यिक व साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
×