आजी-माजी सैनिक पुन्हा एकदा वारकरी गणवेशात आळंदी मध्ये
व्हिजन 24 न्यूज
भारतीय सैनिक सामुदायिक पारायण सोहळा (वर्ष दुसरे) नियोजन करण्यात आलेले आहे. त्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी यांच्या कडुन दिनांक १८ एप्रिल २०२४ ते २३ एप्रिल २०२४ या कालावधी मध्ये सप्ताह करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. सदर सैनिक पारायण सोहळा हा ह.भ.प. ब्रिगेडियर सुनील बोधे व ह. भ.प. कर्नल व्यंकटराव खाडगे, श्री संजय डोंगरे, श्री सुधीर जगताप, उमेश बाबर यांच्या मार्गदर्शना मध्ये होत आहे.
तरी इच्छुक आजी-माजी सैनिक व त्यांच्या परिवारातील सदस्य यांनी या पारायण सोहळ्यामंध्ये सहभागी व्हावे, असे आव्हान सैनिक सोहळा कमिटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आजी माजी सैनिकांना करण्यात आले आहे.
सैनिकी पारायण सोहळ्याचे वैशिष्ट्य ज्ञानेश्वरी पारायण संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी आवारामध्ये होणार आहे. या सप्ताहामध्ये कीर्तनकार, मृदंगाचार्य, टाळरी ही सर्व मंडळी आजी-माजी सैनिक व त्यांच्या परीवारातील असतील. हा कार्यक्रम फक्त आजी-माजी सैनिकांच्या सहकार्यातून राबवला जात आहे. आजी-माजी सैनिका शिवाय या कार्यक्रमात कुठल्याही व्यावसायिक व राजकीय लोकांचा सहभाग नसेल. 2023 हे प्रथम वर्ष असूनही 120 माजी सैनिक ग्रंथराज पारायणासाठी सात दिवस उपस्थित होते. यावर्षी हा आकडा पाचशे एक निश्चित केलेला आहे. पूर्ण महाराष्ट्र मधून फक्त पाचशे एकच आजी-माजी सैनिकांची व्यवस्था येथे केली जाणार आहे. येणाऱ्या अल्पकाळामध्ये नाव नोंदणी शुल्क जाहीर करण्यात येईल. सात दिवस आळंदी मध्ये राहण्याची, खाण्याची सर्व सुविधा कमिटीच्या माध्यमातून करण्यात येईल. हा खर्च सर्व आजी-माजी सैनिकांच्या देणगीतून केला जाईल. कमिटीच्या निर्णयानुसार कार्यक्रमाची रूपरेखा वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. यासाठी सर्व आजी-माजी सैनिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपले नाव नोंदणी पुढील नंबर वर त्वरित करावी. ही माहिती आमच्या पत्रकारांना श्री संजय चंद्रभान डोंगरे पाटील (माजी सैनिक), जन संपर्क आणि मीडिया प्रमुख भारतीय सैनिकी सामुदायिक पारायण सोहळा (वर्ष दुसरे) यांनी दिली आहे