बऱ्हाणपूर येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ
व्हिजन 24 न्यूज
अहमदनगर : जगदंगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज माघ शुद्ध.दशमी अनुग्रहानिमित्ताने सालाबादप्रमाणे शेवगाव तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे दिनांक 18 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी या कालावधीत ह.भ.प आकाश महाराज नजन दत्तगुरु अध्यात्मिक वारकरी शिक्षण सस्था सामणगाव यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी संप्रदायातील कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
अखंड हरिनाम सप्ताह काळात ह. भ. प.मोनिका महाराज म्हस्के, ह.भ.प. भक्ती महाराज घोडके,श्वेता महाराज बढे, प्रतिभा महाराज शेळके,गानकोकिळा युवा कीर्तनकार वैष्णवी महाराज मुखेकर, ह.भ.प. सरस्वती महाराज ढवळे यांची अखंड हरिनाम सप्ताह काळात जाहीर हरिकीर्तने होणार आहेत.गाथा पारायण समारोपण निमित्त ह. भ. प.अशोक महाराज मगर यांचे प्रवचन होईल. व दिनांक 24 फेब्रुवारी सकाळी ह.भ.प. राष्ट्रसंत श्री.बद्रीनाथ महाराज तनपुरे याचे अमृततुल्य काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होईल.त्यानंतर भाविक भक्तांना डॉ. शिवाजीराव मोहनराव दिवटे पाटील यांची शिगोरी आमटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या धार्मिक कार्यक्रमाचा आव्हाने पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आव्हान ह.भ.प.सुभाष महाराज दिवटे पाटील यांनी केले आहे.