शेतकऱ्यांच्या शिव पाण॑द रस्त्यासाठी नगर जिल्ह्यातील तहसील समोर आंदोलन;
काही तालुक्यात यश तर काही तालुक्यात अपयश- पै. पानसरे छबनराव
शेतकऱ्यांच्या शिव पाण॑द रस्त्यासाठी नगर जिल्ह्यातील तहसील समोर आंदोलन;
काही तालुक्यात यश तर काही तालुक्यात अपयश- पै. पानसरे छबनराव
अहमदनगर : नगर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन उभारले आहे. शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न बिकट होत चाललेला आहे. इकडं हायवे रोड वाढत चाललेले आहेत. परंतु शेतकऱ्यांना आपल्या शेतातील माल घरापर्यंत नेण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. तसेच शेतीचे काम करण्यासाठी व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ते नाहीत? शेतीची विभागणी होऊन पडीक जमिनी शेतकरी पिकवत आहेत. परंतु तेथे जाण्यासाठी रस्ते नसल्यामुळे रस्त्यावरून शेतकऱ्यात वाद होऊन कोर्ट-कचेरी, पोलीस स्टेशन, खून हाणामाऱ्या, अशा प्रकारचे वाद-विवाद निर्माण होत आहे. तर काही शेतकऱ्यांनी भांडण तंटा नको असल्यामुळे जमिनी करणे सोडून दिल्या आहे. परंतु याकडे शासनाचे कोणतेही लक्ष नाही? राजकीय मंडळी हेवे दावे, तिकीट मिळण्याच्या प्रक्रियेत पेटलेली आहे.
तीन वर्ष कोरोना व राहिलेले ते मुख्य राजकारण पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नाही? शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ते नसल्यामुळे हे वादाचे स्वरूप प्राप्त होत आहे. प्रत्येक तालुक्यातून अशी आंदोलने उभारले जात आहे. पारनेरचे वातावरण घोषणाबाजी ने दणाणून सोडले परंतु या अमरन उपोषणास शिवजयंतीच्या दिवशी सुद्धा तिथे अजून यश आलेले नाही पण राहुरी तालुका तहसील कार्यालयासमोर या आंदोलनासाठी मार्गदर्शन करत शेतकरी चळवळीचे प्रणेते पै पानसरे छबनराव व शरद पवळे यांना यश आले असून तहसीलदार साहेबांनी तशी लेखी आश्वासन देऊन उपोषण सोडलेले आहे.
सदर घटनेबद्दल बाळासाहेब सोळंके मालुंजे, दादासाहेब पवार मालुंजे, बाळासाहेब रेवाळे वांजुळपोई, सुनील भालके, राजेंद्र देठे, कांतीलाल पवार वाळुंजपोई, भागीरथ पवार, साहेबराव थेवरकर मालुंजे, उत्तम आहेर, संतोष कवाने, गोरखनाथ रेवाळे, पोपट पवार, नितीन नाईकवाडे ताराहाबाद इ. सर्व शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. परंतु पारनेर तालुक्याचे आंदोलन न मिटल्यास राहुरी तालुक्यातील शेतकरी राहुरी तालुका बंद असे आंदोलन सुरू करणार आहेत. सदर घटनेमुळे शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजीराजे यांच्या कार्यांची आठवण येत आहे.